शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

महाराष्ट्र हादरलं ! अल्पवयीन पीडितेवर ४०० जणांसह एक नव्हे तर दोन पोलिसांनी केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 1:16 PM

Minor Girl Gang Raped By 400 People: सासरी छळ झाल्याने ती माहेरी आली. तेथे जन्मदात्या वडिलानेच तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला.

बीड: अंबाजोगाई तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात एक नव्हे तर दोन पोलिसांचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. पीडित मुलीने पुरवणी जवाबात त्यांचा उल्लेख केल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली. दरम्यान, रक्षकच भक्षक बनल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी पिडीतेने तब्बल ४०० जणांनी तिच्यावर विविध ठिकाणी अत्याचार केल्याचा जवाब दिल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरले होते. ((Minor Girl Gang Raped By 400 People )

अल्पवयीन पीडिता अवघ्या ९ वर्षांची असताना आईचे निधन झाले. त्यामुळे चुलत्याने १३ व्या वर्षीच तिचा विवाह उरकला. मात्र, सासरी छळ झाल्याने ती माहेरी आली. तेथे जन्मदात्या वडिलानेच तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यामुळे अंबाजोगाईत भीक मागत भटकणाऱ्या या मुलीसोबत सहा महिन्यांत अनेकांनी कूकर्म केले. दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी तिच्या तक्रारीवरून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. ११ रोजी पीडितेला बाल कल्याण समितीपुढे हजर केले होते. 

यावेळी तिने धक्कादायक खुलासा करत सहा महिन्यांत चारशे जणांनी अत्याचार केल्याचा दावा केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे यांनी दिली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी तपास अंबाजोगाईच्या अपर अधीक्षक कविता नेरकरांकडे सोपविला. या प्रकरणात कोणाचीही गय करणार नाही, पोलीस दोषी असतील तर निश्चितपणे कारवाई होईल, असा इशारा अधीक्षक आर. राजा यांनी दिला आहे.

एकाने केला अतिप्रसंग, दुसऱ्याने घरी नेऊन अत्याचारदम्यान, बालकल्याण समितीपुढे केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी बीडमध्ये अल्पमुदती निवासीगृहात पीडितेचा पुरवणी जवाब नोंदविला. समुपदेशक मनीषा ताेकले यांच्यासमोर नोंदविलेल्या पुरवणी जवाबात पीडितेने अत्याचार करणाऱ्या काही लोकांची नावे तर काहींचे वर्णन व घटनास्थळाची सविस्तर माहिती दिली. यात तिने दोन पोलिसांचाही उल्लेख केला आहे. त्यापैकी एकाने हॉटेलवर नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याने तिला स्वत:च्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक दावा तिने केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड