- दीपक नाईकवाडेकेज (बीड) : पिक विमा आणि नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज सकाळी ११ वाजता शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलनकांनी रेड्याला निवेदन देऊन राज्य सरकार आणि विमा कंपनीच्या कार्य पध्दतीचा निषेध केला.
आंदोलकांनी सोयाबीन पिकाला ८०% पीक विमा लागू करावा. पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रु. प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे. अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहाणी व नुकसानीची माहिती मोबाईलवरून नोंदवता येत नसल्याने ही माहिती शेतकऱ्याकडून ऑनलाईन ऐवजी ऑफ लाईन पद्धतीने स्विकारण्यात यावी आदी मागण्यांसाठी आंदोलकांनी रास्तारोको केले. दरम्यानम शासनाचा व विमा कंपनीच्या कार्याचा निषेध करत आंदोलकांनी आंदोलन रेड्याला सदर केले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अनिल रांजणकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोराळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमर पाटील, पशुपतीनाथ दांगट, प्रवीणकुमार शेप, किसन कदम, कपिल मस्के, अशोक गित्ते, सुधीर चौधरी, महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भागवत पवार, जमील पटेल, मुकुंद कणसे, दलील इनामदार, समीर देशपांडे, विनोद शिंदे, वसंत भांगे, विश्वास जाधव, युवराज मगर, सांगळे, बंडू इंगळे, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पिक विमा कंपनी आणि सरकारच्या नावाने गोंधळशेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊन ही अद्याप ही शेतकऱ्यांना शासनाने पीकविमा व नुकसान भरपाई जाहीर न केल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी या आंदोलनात गोंधळ्याचा वेष परिधान करून हलगी व झांजेच्या तालावर ठेका धरीत सरकार आणि विमा कंपन्यांच्या नावाने गोंधळ घातला.