लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामीण बँकेच्या समोर सोमवारी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना, शेतकरी-शेतमजुरांना तसेच सर्वसामान्य माणसाला दिवसभरात किमान दोन वेळा पोटभर जेवण मिळावे, म्हणून पंतप्रधान व भारत सरकारने मुद्रा योजना सुरू केली आहे. परंतू सहा महिने झाले तरी मुद्रा योजने मार्फत कर्जाची मागणी करण्यात येत आहे. मात्र त्याकडे बँकेने दुर्लक्ष केले. याबाबत अनेकवेळा निवेदने दिले. रास्ता रोकोही करण्यात आला, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सर्वसामान्यांची कामे करून येथील अधिकाºयांची बदली करावी, अशी मागण्ी यावेळी करण्यात आली.यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.महादेव नागरगोजे, कॉ.महारूद्र आघाव, कॉ.भगवान भारती, कॉ.आबासाहेब कापरे, कॉ.भाऊसाहेब नागरगोजे, कॉ.केशव डोंगरे, कॉ.चंद्रकांत बारगजे, कॉ.गंगाराम मिसाळ आदींसह युवकांचा आंदोलनात सहभाग होता.कर्जाची मागणी करुनही दुर्लक्षचसुशिक्षित, बेरोजगार युवक, युवतींना उद्योग व्यवसायासाठी पंतप्रधान व भारत सरकारने मुद्रा योजना सुरू केली आहे. या अंतर्गत सहा महिने झाले तरी मुद्रा योजनेमार्फत कर्जासाठी मागणी करुनही त्याकडे बँक अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामीण बँकेसमोर धरणे आंदोलन केले.
भाकपचे चकलंब्यात ग्रामीण बँकेसमोर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:48 IST
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामीण बँकेच्या समोर सोमवारी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
भाकपचे चकलंब्यात ग्रामीण बँकेसमोर धरणे आंदोलन
ठळक मुद्देमुद्रा कर्ज देण्याची केली मागणी; अधिकाऱ्यांना दिले निवेदन