लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य सरकारने १६ जानेवारीच्या राजपत्रानुसार कोर्ट फीस आणि मुद्रांक दरात केलेल्या भरमसाठ दरवाढीच्या विरोधात जिल्हा वकील संघाने गुरुवारी न्यायालयीन कामकाजात सहभागी न होता निषेध रॅली काढून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.
मुद्राकांमध्ये तसेच पूर्वीच्या कोर्ट फीमध्ये जास्तीची वाढ करुन जनतेवर अन्याय केला आहे. ती परवडणारी नाही. त्यामुळे २४ जानेवारी रोजी जिल्हा वकील संघाने बैठकीत ठराव घेऊन या दरवाढीचा निषेध केला. तसेच गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. यात संघाचे सदस्य मोठ्या सहभागी होते.
मुद्रांक आणि कोर्ट फी दरात केलेली दरवाढ मागे घ्यावी यावर फेरविचार करावा अशा मागणीचे निवेदन वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण राख, उपाध्यक्ष अॅड. अरविंद पाटील, सचिव आर. डी. येवले, सहसचिव अॅड. विजय पंडित, कोषाध्यक्ष अॅड. सईद देशमुख, ग्रंथपाल सचिव अॅड. कैलास गवळी, महिला प्रतिनिधी अॅड. अश्विनी हसेगावकर आदींनी दिले.