माजलगाव
: शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या (लालबावटा) वतीने तहसील कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना न भेटता घरी जाणाऱ्या तहसीलदारांची गाडी आंदोलकांनी अडवित आपल्या मागण्या नेटाने मांडल्या.
महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्यावतीने तहसील कार्यालयासमोर कॉ. मुसद्दीक बाबा व कॉ. शिवाजी कुरे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले. विभक्त झालेल्या कुटुंबांना रेशन कार्ड वाटप करा, तालुक्यातील प्रत्येक गावातील ड यादीमध्ये असलेल्या कुटुंबीयांना घरकुल वाटप करा, श्रावण बाळ, संजय गांधी योजना, वृद्धापकाळ आदी योजनेतील लाभार्थ्यांना २१ हजार रुपये उत्पन्नाची जाचक अट रद्द करावी, रोजगार हमीचे जॉब कार्ड विभक्त कुटुंबास वाटप करा, लसीकरणाचा वेग वाढवावा यासह आदि मागण्यांचा समावेश होता.
सकाळपासून हे आंदोलन सुरू असताना तहसीलदारांनी भेट दिली नाही. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तहसीलदार वैशाली पाटील या घरी जेवायला जात असताना त्यांची गाडी अडवली. यावेळी अनेक महिला त्यांच्या गाडीसमोर बसल्या. यावेळी या ठिकाणी एकच पोलीस हजर असल्याने प्रशासनाची धांदल उडाली. कसेतरी करून आंदोलकांना बाजूला करण्यात आले.
या आंदोलनात सय्यद रज्जाक, बळीराम भुंबे, बंडू गरड, शांतीलाल पटेकर, आसराबाई आव्हाड, संगीता डावरे, दगडाबाई अवघडे, रंधावनी शिंदे, जनाबाई सोनटक्के , सावित्रीबाई बडे यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले होते.
190721\purusttam karva_img-20210719-wa0039_14.jpg~190721\purusttam karva_img-20210719-wa0026_14.jpg