जनावरांचा ठिय्या
माजलगाव : शहरातील रस्त्यांवर अनेक मार्गांवर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेक वेळा अपघाताची उदाहरणे आहेत. जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे. परंतु याकडे संबंधितांनी अद्यापही दुर्लक्ष केलेले आहे.
अवैध धंदे जोमात
पाटोदा : परिसरात बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये चोरून लपून मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरित्या दारूची विक्री होत आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
गतिरोधक उभारावेत
बीड : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या गतिरोधकाची दुरवस्था झाली आहे. अनेकवेळा या सपाट झालेल्या गतिरोधकामुळे वाहनांच्या गतीला आवरता येत नसून, वाहनधारक सुसाट वेगाने वाहन चालवून धोका निर्माण करीत आहेत.
पथदिवे बंद
माजलगाव : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक खेडयांमध्ये अघोषित भारनियमन सुरूच आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. परिणामी नागरिकांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे चोरींच्या घटना वाढत आहेत.