बीड : तालुक्यात शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होऊ लागल्याने विद्युत पंप सुस्थितीत चालत नाहीत. ते सतत बंद पडत आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
जनावरांचा ठिय्या
माजलगाव : शहरातील अनेक मार्गांवर मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेकवेळा यामुळे अपघात होत आहेत. या जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे. परंतु, याकडे संबंधितांनी अद्यापही दुर्लक्ष केले आहे.
अवैध धंदे जोमात
माजलगाव : परिसरात बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळवला जातो. तसेच अवैधरित्या दारूची विक्री होत आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
गतिरोधक दुरुस्तीची मागणी
बीड : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या गतिरोधकांची दुरवस्था झाली आहे. अनेकवेळा या सपाट झालेल्या गतिरोधकांमुळे वाहनांच्या गतीला आवरता येत नसून, वाहनधारक सुसाट वेगाने वाहन चालवून धोका निर्माण करत आहेत.
पथदिवे बंद
माजलगाव : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक खेड्यांमध्ये अघोषित भारनियमन सुरूच आहे. यामुळे नागरिकांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे चोरींच्या घटना वाढत आहेत.