शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

१० दिवसात शेतकऱ्यांना मदत द्या; अन्यथा एकही सरकारी कार्यालय चालू देणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 4:28 PM

लोखंडी सावरगाव येथे "स्वाभिमानी" च्या चक्काजाम आंदोलनात पदाधिकाऱ्यांनी दिला निर्वाणीचा इशारा

ठळक मुद्देआंदोलनामुळे वाहतुक दोन तास ठप्प

अंबाजोगाई  : बीड जिल्ह्यात सतत १५ दिवस पडलेल्या बेमोसमी मुसळधार अतिवृष्टीने खरिप हंगामातील सोयाबीन, कापूस,तूर,उडीद, मूग,मका,हायब्रीड ज्वारी, बाजरी आदी सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लक्ष रु नुकसान भरपाई व सरसकट पीकविमा तात्काळ वाटप करण्याच्या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना केज,अंबाजोगाई तालुक्याच्या वतीने लोखंडी सावरगाव ता.अंबाजोगाई येथे बुधवारी ( दि ६ ) सकाळी १० वाजता तब्बल २ तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळेबीड-लातुर-अंबाजोगाई-कळंब महामार्गावर दुतर्फा शेकडो वाहने अडकून पडली होती.

प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आंदोलकांनी अभिवादन करून चक्काजाम आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी माजी. आ. पृथ्वीराज साठे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडी च्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जि.प्रवक्ते प्रकाश बोरगावकर, शेतकरी नेते जयजीत शिंदे, कमलाकर लांडे,वृक्षमित्र सुधाकर देशमुख, लोकजनशक्ती चे राजेश वाहूळे,अंजली पाटील,अंबाजोगाई ता. अध्यक्ष योगेश शेळके,लहू गायकवाड, महेश गंगणे ,प्रमोद पांचाळ,अनिल रांजनकर, परमेश्वर वीर,अभिजीत लोमटे, चंद्रकांत अंबाड,सुग्रीव करपे,भागवत पवार ,शशिकिरण ढगे, आदी संयुक्त पुरोगामी महाआघाडी चे केज,अंबाजोगाई तालुक्यातील मित्रपक्षाचे नेते,पदाधिकारी उपस्थित होते. वरिल नमूद सर्वच पदाधिकऱ्यांनी समायोचित भाषणे करत निष्क्रिय काळजीवाहू सरकारवर टीकास्त्र सोडले.

येत्या १० दिवसात नुकसान भरपाई द्या सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये तात्काळ सरसकट नुकसान भरपाई म्हणून राष्ट्रीय आपत्ती मधून हेक्टरी एक लक्ष रु व सरसकट विना अट पीकविमा वाटप करावा अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली.जर दहा दिवसात नुकसानभरपाई नाही नाही तर बीड जिल्ह्यात कोणतेही सरकारी कार्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी चालू देणार नाहीत. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल. तसेच सर्व गावबंद करून जिल्ह्यात व्यापक बेमुदत जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी प्रशासनाला दिला.

आंदोलनाची दखल घेत अंबाजोगाई तहसीलदार  रुईकर यांनी निवेदन स्वीकारून शासनाकडे तात्काळ पाठवपुरावा केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात लोखंडी सावरगाव, आपेगाव, धानोरा, सोमनाथ बोरगाव,हिवरा, सनगाव,श्रीपतरायवाडी आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांचा सहभाग होता. अंबाजोगाई ग्रामीण चे  पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने चक्का जाम आंदोलन शांततेत झाले. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलनFarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड