दुसरे प्रमुख पाहुणे विद्यालयाचा माजी विद्यार्थी व युवा शास्त्रीय गायक वेदांग डोळे याने आपल्या मनोगतात संगीतातील केदार, यमन व पुरिया धनश्री या रागाबद्दल माहिती सांगत, त्यातील चीज व बंदिशी गाऊन दाखविल्या.
अध्यक्षीय समारोप करताना शालेय समिती अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी वेदांग डोळे व महेशजी वाघमारे यांच्या संगीत साधनेचे कौतुक केले, तसेच संगीताला शालेय जीवनापासूनच महत्त्व दिले पाहिजे. त्यासाठी दर महिन्याला संगीतकला वृद्धिंगत होण्यासाठी मासिक सभेचे आयोजन करू, असे आश्वासन दिले. यावेळी ऑनलाइन माध्यमाने व्यासपीठावर स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष गजानन जगताप, कार्यवाह डॉ.विवेक पालवणकर, शालेय समिती अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, प्रमुख पाहुणे महेश वाघमारे हे उपस्थित होते. विद्यालयात प्रत्यक्षरीत्या मुख्याध्यापक संजय विभुते, पर्यवेक्षक विठ्ठल काळे, संस्था अभ्यासपूरक प्रमुख उमेश जगताप, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख गौरी डावखरे हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नीता केंदे यांनी केले.
210821\21bed_1_21082021_14.jpg
पं. विष्णुशास्त्री पलुस्कर पुण्यतिथी कार्यक्रम