बीड : शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाचा केंद्र सरकारने २०१९ च्या खरीप हंगामासाठी हमीभाव जाहीर केले. हे भाव पुढील वर्षीच्या हंगामासाठी असल्याचे स्पष्ट असताना मागील चार दिवसांपासून किराणा बाजारात विशेषत: डाळींच्या दरात तेजीचे वारे आहे. अचानक तेजी आल्याने किरकोळ तसेच होलसेल व्यापाºयांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वास्तविक पाहता मागील काही महिन्यांपासून किराणा बाजारात ग्राहकी शांत असल्याने उलाढाल मंदावली आहे. मात्र चार दिवसांपुर्वी केंद्र सरकारने हमीभावात वाढीची घोषणा केली. त्यानुसार तुरीमध्ये प्रतीक्विंटल २२५ रुपये, उडीद ४०० तर मुगामध्ये १४०० रुपयांची वाढ केली
सरकारच्या या घोषणेनंतर अचानक डाळींमध्ये तेजी सुरु झाली. या घोषणेपर्यंत डाळींचे भावही बाजारात स्थिर होते. चार दिवसात चणा डाळीत क्विंटलमागे ५०० रुपयांची, तसेच तूर आणि उडीद डाळीत प्रत्येकी ३०० रुपयांची तेजी आहे. मूग डाळीत ४०० तर मटकीमध्ये १४०० रुपयांची तेजी आहे. वाटाण्यातही क्विंटलमागे १ हजार रुपयांची तेजी आहे.
मागील काही दिवसात गव्हातही प्रती क्विंटल २०० रुपये तेजी आहे. त्यामुळे २००० ते २३०० रुपये भाव असलेला गहू २३०० ते २५०० रुपयांपर्यंत पोहचला आहे. पोहे किलोमागे १० रुपयांनी वधारले असून सध्या ५० ते ५५ रुपये किलो भाव आहेत. आयात शुल्कामुळे खाद्यतेलातही तेजी सुरु आहे. १५ लिटर सूर्यफुल तेलाचा १२६० चा डबा १३२० तर १२०० रुपयांचा सोयाबीनचा डबा १२५० रुपये विकला जात आहे.
साखर, साबुदाणा वधारलेआयात शुल्क व कोटा पध्दतीमुळे साखरेच्या दरातही क्विंटलमागे ५०० रुपयांची तेजी आहे. ठोक भाव ३ हजार रुपये होते. आता ३ हजार ५०० आहेत. १५ दिवसांवर आषाढी एकादशीमुळे मागणी वाढल्याने एमएस शाबुदान्याचे भाव क्विंटलमागे ७०० रुपयांनी वाढले आहेत. सध्या ५५ रुपये भाव असून, ७० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.