लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : शहरात सोमवारी विनामास्क फिरणाऱ्या ९ जणांवर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७ दुकानांवर कारवाई करुन ५ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागील महिनाभरात शिरूर कासार नगर पंचायतीमार्फत विनामास्क फिरणाऱ्या एकूण २९७ लोकांवर कारवाई करुन ८१ हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७ दुकानांवर कारवाई करुन ३५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १ लाख १६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये तसेच अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरावा, व्यावसायिकांनी दुकानासमोर ६ फूट अंतरावर दोरी बांधावी, सामाजिक अंतराचे पालन करावे, ग्राहकांची मर्यादा पाळावी तसेच स्वच्छता आणि प्लास्टिक बंदीबाबतच्या नियमांचे पालन करावे. शासन नियमावलींचे पालन करुन नगर पंचायत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले आहे.