गेवराई : जिल्ह्यात कडक लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात दररोज पोलीस, नगर परिषदेच्या वतीने विनाकारण रस्त्यावर फिरणारे, विनामास्क फिरणा-या ७४ जणांवर कारवाई केली. तर, ११ दुकानदारांना दंड आकारण्यात आला.
जिल्ह्यात कडक लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेवराई शहरात दररोज विनामास्क, विनाकारण रस्त्यावर फिरणारे, लाॅकडाऊनच्या काळात दुकाने उघडणा-यांविरुद्ध पोलीस व नगर परिषदेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने शनिवारी सकाळी व दुपारी शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर विनाकारण फिरणा-या ६५ नागरिकांकडून १३ हजार ३०० रुपये दंड आकारण्यात आला. तर, विनामास्क फिरणा-या ९ जणांकडून १२०० रुपये दंड आकारण्यात आला. तर, लाॅकडाऊन असतानादेखील ११ दुकानदारांनी आपली दुकाने उघडी ठेवली होती. त्यांच्यावर कारवाई करत ५ हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आला. यावेळी गेवराई पोलीस ठाण्याचे अधिकारी, नगर परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते.
...
मोहीम रोज सुरू राहणार
गेवराई शहर परिसरात आता ही मोहीम शहरात दररोज सुरू ठेवणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी केले आहे.
===Photopath===
090521\20210503_184557_14.jpg