संजय खाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परळी विभागीय कार्यालयाअंतर्गत ९ खरेदी केंद्राच्या २७ जिनींगमध्ये तीन महिन्यांपूर्वी कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. या केंद्रावर मंगळवारपर्यंत एकूण ४ लाख ७७ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.राज्यात पणन महासंघाचे एकूण ११ विभागीय कार्यालय आहेत. ११ विभागापैकी सर्वाधिक कापूस खरेदी परळी विभागात झाली आहे. पाच वर्षात परळी विभागात कापूस खरेदी समाधानकारक झालीच नव्हती. यावर्षी मात्र राज्यात विक्र म करणारी कापूस खरेदी परळी विभागात झाली आहे. शासकीय कापूस खरेदीचा दर खाजगी खरेदीपेक्षा जास्त असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कल यावर्षी शासकीय कापूस खरेदी केंद्रावरच दिसून येत आहे. कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी कापसाच्या वाहनांची रीघ लागली आहे. परळी विभागात कौडगाव, धर्मापुरी, माजलगाव, मैंदा, साखरे बोरगाव, वडवणी, कुप्पा, भोपा, धारूर, केज, सारूळ, हासेगाव या ९ खरेदी केंद्राचा समावेश आहे. या ९ खरेदी केंद्राअंतर्गत २७ जिनींग असून या जिनींग व कापूस खरेदी केंद्रावर ४,७७,०३६ क्विं. कापुस खरेदी झाली असल्याची माहिती पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक पी.बी.बुकवाल व उपव्यवस्थापक एस.एस.इंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कापूस खरेदी केंद्रावर ५३,३५० ते ५,४५० प्रति क्विं. एवढ्या भावाने खरेदी चालू आहे. कापूस केंद्रावर ५ वर्षात प्रथमच विक्रमी कापूस विक्रीसाठी आला यंदा बीड जिल्ह्यात कापसाचे विक्र मी उत्पादन झाले आहे. कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यात पावसानेही साथ दिली, पीक मोेठ्या प्रमाणात आले. कापूस वेचणीसाठी खर्च शेतकऱ्यांस जास्त आला. त्यामुळे कापसाला जादा भाव मिळाला पाहिजे. ८ हजार क्विं. दराने कापूस खरेदी हवी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन संघाचे संचालक राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष अॅड.विष्णूपंत सोळंके यांनी केली.
९ केंद्रांवर ४ लाख ७७ हजार क्विंटल कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:20 AM
महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परळी विभागीय कार्यालयाअंतर्गत ९ खरेदी केंद्राच्या २७ जिनींगमध्ये तीन महिन्यांपूर्वी कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे.
ठळक मुद्देपरळी विभागातील केंद्रांवरील स्थिती : राज्यात सर्वाधिक कापूस खरेदी परळी विभागात; २७ जिनिंग, केंद्रांवर खरेदी