शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
2
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
3
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
4
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
5
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
6
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
7
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
8
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
9
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
10
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
11
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
12
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
14
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
15
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
16
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
17
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
18
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
19
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
20
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं

बीड तालुक्यात साडेतीन लाख क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:31 AM

बीड : तालुक्यात आतापर्यंत ३ लाख ४९ हजार ३२८ क्विंटल कापसाची खरेदी झाली असून आतापर्यंत १० हजार शेतकऱ्यांचा कापूस ...

बीड : तालुक्यात आतापर्यंत ३ लाख ४९ हजार ३२८ क्विंटल कापसाची खरेदी झाली असून आतापर्यंत १० हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे तर नोंदणी केलेल्या २,२२३ शेतकऱ्यांचा कापूस मापाच्या प्रतीक्षेत आहे. कापूस खरेदी १६ तारखेपर्यंत करण्याच्या सूचना आहेत. चार दिवसात शेतकरी नोंदणीनुसार शिल्लक कापसाची खरेदी प्रक्रिया होणे अशक्य असल्याने कापूस खरेदीसाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. शासकीय हमीदराने कापूस खरेदीला बीड तालुक्यात १८ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती. एकूण १२ जिनिंगवर खरेदी केंद्र आहेत. यात पणन महासंघाचे २ व कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे १० केंद्र आहेत.

जिनिंग केंद्र शेतकरी खरेदी

जयश्री जिनिंग नामलगाव ७८४ २६,५४५

संकल्प, मोची पिंपळगाव ४४४ १४,५१७

नगदनारायण, साक्षाळपिंप्री ३९७ १२,६७२

पद‌्मावती, नाथापूर ३४४ १२,५१०

एस.आर. कॉटन, नामलगाव १५२७ ५०,४५१

पार्वती जिनिंग, घोसापुरी १४९३ ४९,२७०

शौर्य, कुमशी ६६८ २३,४५७

नर्मदा काॅटन, मैंदा १०३७ ३६,४५२

साई कॉटेक्स, सा. बोरगाव ५०१ १९,००९

यशोदीप, मांजरसुंभा ४४० १३,७५५

कल्पतरू जिनिंग ३५४ १२,८३३

सद‌्गुरू जिनिंग २१९८ ७७,८५१

--------------

हमीभावातही घसरण

शासनाने कापसाचा हमीदर ५ हजार ७२५ रुपये क्विंटल असा जाहीर केला होता. मात्र नंतरच्या टप्प्यात ५ हजार ६१५ रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळाला. कापसाचा दर्जा हे एकमेव कारण सांगण्यात येत होते. खासगी व्यापाऱ्यांनी मात्र ५ हजार ४०० ते ५ हजार ५०० रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी केला.

-----------

कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेले शेतकरी १२,२२३

कापूस मोजमाप झालेले शेतकरी १०,०९०

आतापर्यंत एकूण कापूस खरेदी ३,४९, ३२८.३१ क्विंटल