प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत राज्यात १३ कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. शासकीय कार्यालय, ग्रामपंचायतींसह सरकारी यंत्रणांना यात सहभागी करुन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यासाठी ३३ लाख २२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे आव्हान यंत्रणा कितपत पेलतात, याकडे लक्ष लागले आहे.
उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण तसेच इतर शासकीय कार्यालयातील प्रमुखांची आढावा बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. येत्या ५ जून रोजी स्वत: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच यावेळी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी मुनगंटीवार सूचना करणार आहेत.
वृक्ष लागवडीसाठी प्रशासनामधील ३० विभाग सहभागी होणार आहेत. यामध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी, शिक्षण, आरोग्य, नगरपालिका, पंचायतमिती, तसेच जिल्ह्यातील १०३१ ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात ३३ लाख २२ हजार वृक्ष लागवडीसाठी ५० हजार ६०० स्थळं निश्चित करण्यात आली आहेत. तसेच वृक्षरोपणासाठी २८ लाख ९१ हजार खड्डे वन विभागाकडून खोदण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात वृक्ष लागवडीचे काम गतीने होईल अशी अपेक्षा वन अधिकाºयांनी व्यक्त केली.मागील वर्षात किती वृक्ष जगले ?शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठेवले आहे. गेल्यावर्षी ४ कोटी वृक्ष लागवड झाली. यामध्ये बीड जिल्ह्यासाठी १२ लाख ८२ हजार उद्दिष्ट देण्यात आले होते. पैकी किती वृक्ष जगले हा प्रश्न मात्र कायम आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण तसेच इतर शासकीय कार्यालयांनी केलेल्या वृक्ष लागवडीमध्ये किती वृक्ष जगले याची अधिकृत माहिती समोर येत नाही.
राजकीय हस्तक्षेप वाढलावन विभाग व सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून बोगस कामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकाºयांवर दबावतंत्राचा वापर काही राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. हा गैरप्रकार रोखला तर वनविभागाची कामे मोठ्या प्रमाणात करता येतील, व जिल्हा हिरवागार होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया एका प्रशासकीय अधिका-याने दिली.
सामाजिक वनीकरण विभागात सावळा गोंधळजिल्ह्यात सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून झालेल्या वृक्ष लागवडीत अनेक ठिकाणी बोगस वृक्ष लागवड केल्याचे समोर आले होते. ही बोगस कामे करण्यामागे काही राजकीय नेते असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी योग्य चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
वृक्ष लागवडीची तयारी पूर्णलागवड केलेली झाडे जगवणे हे वन विभागापुढे एक आव्हान असते. झाडे का जगत नाहीत याविषयी आम्ही अभ्यास केला. त्यावेळी लक्षात आले की झाडे लावताना त्याची उंची किमान ४ फूट असावी त्यामुळे ते झाड अधिक चांगल्या प्रकारे वाढते. अधिक प्रमाणात झाडे जगवण्यासाठी यावर्षीची वृक्ष लागवड करताना हा प्रयोग केला जाणार आहे. ३३ लाख वृक्ष लागवडीची तयारी पूर्ण झाली आहे.- अमोल सातपुते, विभागीय वन अधिकारी