विलास भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : पैठणच्या श्रीमंत संत एकनाथ महाराजांच्या पालखीची घुमरा पारगाव येथील गोल रिंगणाची परंपरा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिंगणासाठीच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पारगावात गोल रिंगणाऐवजी उभा रिंगणसोहळा पार पडला. वारकऱ्यांनी नव्याने तयार झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर उभे रिंगण साजरे करून परंपरा जोपासली .पैठण येथून संत एकनाथांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर १८ मुक्कामाच्या पायी प्रवासात पाच ठिकाणी रिंगण सोहळा पार पडतो. पहिले रिंगण मिडसांगवी, दुसरे पारगाव घुमरा, तिसरे नागरडव्ह, चौथे कव्हेदंड आणि पाचवे रिंगण व पादुका आरती सोहळा शिराढोण ते पंढरपूर दरम्यान पार पडतो .नारायण महाराजांपासून सुरु असलेली रिंगण परंपरा रघुनाथबुवा गोसावी पुढे चालवत आहेत. पारगाव घुमरा येथे गावालगत असलेल्या मांजरा नदीपात्रात सुरुवातीपासून रिंगणसोहळा पार पडत असे. या जागी कोल्हापुरी बंधारा बांधल्यामुळे सोहळा जि. प. शाळा प्रांगणात साजरा होत असे. शाळेच्या खोल्या बांधकाम आणि संरक्षक भिंतीमुळे या ठिकाणी जागाच शिल्लक राहिली नाही. परिणामी रिंगण सोहळा न करता रस्त्यावर उभे रिंगण सोहळा झाला.विशेष परवानगी घेणार : रघुनाथबुवा गोसावी४पारगावी गोल रिंगणऐवजी रस्त्यावर उभे रिंगण सोहळा पार पडला. पैठण-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर हा सोहळा साजरा झाला. सध्या अर्धवट काम असल्याने रस्त्यावर रहदारी अल्प प्रमाणात आहे.४पुढील वर्षापर्यंत रहदारीत मोठी वाढ झाल्यास उभे रिंगण सोहळा साजरा करणे धोकादायक ठरणार आहे. पारगावची रिंगण परंपरा कायम ठेवण्यासाठी रस्त्यावर उभे रिंगण घेण्यासाठी विशेष परवानगी मागणार असल्याचे पालखीप्रमुख रघुनाथबुवा गोसावी यांनी सांगितले .
रिंगण सोहळ्याचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 11:48 PM
पैठणच्या श्रीमंत संत एकनाथ महाराजांच्या पालखीची घुमरा पारगाव येथील गोल रिंगणाची परंपरा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देनाथांची पालखी : ऐतिहासिक परंपरा खंडित होण्याची शक्यता, झाले उभे रिंगण