बीड : मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये रबी पिकांसह फळबागांना फटका बला आहे.धारूर तालुक्यात दोन दिवस अवकाळीधारूर : शहर व तालूक्यात दोन दिवसा पासून अवकाळी व काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रबी पिकाचा विमा कुठल्याच कंपनीने न स्विकारल्याने शेतकरी या नुकसानीने दुहेरी संकटात सापडला आहे. शासनाने नुकसान भरपाई पंचनामे करून तात्काळ द्यावे अशी मागणी शेतकरी विनायक शिनगारे, भागवत शिनगारे आदींनी केली आहे.बर्दापूर परिसरात हरभ-याचे काढ भिजलेबर्दापूर : अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर व परिसरात जोराचा वारा व अवकाळी पाऊस झाल्याने शेतातील हरभ-याचे काढ भिजले. जोराच्या वा-यामुळे ज्वारी व मक्याचे पीक आडवे झाले आहे. गव्हाचेही नुकसान झाले.आष्टीत फळबागांचे नुकसानअंभोरा : रविवारी दुपारी तीन वाजता अंभोरा सोवडगाव दौलावडगाव, बांदखेल परिसरात जोरदार वा-यासह पाऊस आला. वादळ वाºयामुळे संत्री पिकाचे अतोनात नुकसान झाले. पंचनाम्याची मागणी दौलावडगाव गटाचे माजी जि.प.सदस्य सुखदेव खाकाळ यांनी केली आहे.शेतक-याला अवकाळीची धास्तीशिरूर कासार : आधीच मजुरांची वाणवा त्यात पुन्हा शनिवारपासून आभाळाने त्याचा रंग दाखवायला सुरुवात केली आहे. पावसासोबत रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाने ज्वारीचे कणीस सोपटले गेले आहे, तर कडबा काळा पडला आहे. ज्वारी काढताना पाण्यामुळे अंगाला खाज येत आहे.बंगाली पिंपळा, कोळगावात वीज कोसळलीगेवराई : तालुक्यातील बंगालीपिंपळा येथे रविवारी ५ वाजता वीज कोसळून येथील शेतकरी बबन देवराव खताळ यांची म्हैस जागीच ठार झाली आहे. त्यामुळे त्यांचे ८० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी बबन देवराव खताळ यांनी केली आहे. तसेच तालुक्यातील कोळगाव येथे रविवारी सायंकाळी मंदिराच्या कळसावर वीज पडल्यामुळे तडे गेले आहेत. कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती बबन महाराज लोंढे, जयदत्त बनसोडे यांनी दिली.अंबाजोगाईतही नुकसानअंबाजोगाई : तालुक्यात शनिवारी रात्री व रविवारी दुपारी वादळी पाऊस मोठया प्रमाणात झाला. अवकाळी पावसामुळे ज्वारीचे पीक आडवे झाले आहे. तर हभºयाचे ढिगारे भिजून विस्कटले.मेघ गर्जनेसह सिरसाळ्यात पाऊससिरसाळा: परळी तालुक्यातील सिरसाळा येथे सोसाट्याचा वारा व मेघ गर्जनेसह रविवारी दुपारी ३ वाजता अवकाळी पावसाने तासभर हजेरी लावली. ज्वारी, हरभरा, गहू या पिकांचे नुकसान झाले. येथील मुख्य व्यवसाय असणा-या वीटभट्टी चालकांच्या कच्च्या मालाचे मोठे नुकसान झाले.येवता परिसरात गारांसह जोराचा पाऊस झाला. यामुळे ज्वारी, गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उजनी (ता. अंबाजोगाई) परिसरात पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. बनसारोळा, घाटनांदूर, आडस परिसरात जोरदार, तर लोखंडी सावरगाव येथे रिमझिम पाऊस झाला. पिंपरी घाटा परिसरात वादळी वा-यासह झालेल्या पाऊसामुळे डाळींब, संत्रा इत्यादी बागांचे तसेच, काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे.
अवकाळीने रबीचा घास हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 11:31 PM
मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये रबी पिकांसह फळबागांना फटका बला आहे.
ठळक मुद्देबीड जिल्ह्यात पिकांचे नुकसान : ज्वारीसह गहू, हरभरा झोपले; फळबागांनाही फटका; तात्काळ पंचनामे करण्याची मागणी