लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका बाजारपेठेप्रमाणेच बस, रेल्वेसेवेलाही बसला आहे. प्रवाशांची संख्या रोडावल्यामुळे रेल्वेचे आरक्षण रिकामे आहे.
परळी रेल्वेस्थानकावरून ३१ मार्च रोजी सिकंदराबाद, औरंगाबाद आणि परळीला जाणाऱ्या रेल्वेच्या आरक्षणाची माहिती घेतली असता सर्व गाड्यांचे आरक्षण रिकामे होते. परळीहून सिकंदराबादला जाणाऱ्या शिर्डी-कोईंबतूरच्या स्लीपरचे २० तर थर्ड एसीचे ८ बर्थ रिकामे होते. औरंगाबादला जाणाऱ्या कोईंबतूर -शिर्डीच्या स्लीपरचे १६ तर थर्ड एसीचे १२ बर्थ रिकामे होते. औरंगाबाद फेस्टीव्हल गाडीचे स्लीपरचे ३४८ तर थर्ड एसीचे ३५ बर्थ रिकामे होते.
औरंगाबादहून परळीत येण्यासाठी ३१ मार्च रोजी औरंगाबाद फेस्टीव्हल गाडीचे स्लीपरचे ३४९ तर थर्ड एसीचे ३५ बर्थ रिकामे होते. सिकंदराबादहून परळीत येण्यासाठी ३१ मार्च रोजी कोईंबतूर-शिर्डी गाडीचे स्लीपरचे १४ तर थर्ड एसीचेही बर्थ रिकामे होते. तसेच औरंगाबाद फेस्टीव्हल गाडीचे स्लीपरचे ३१३ तर थर्ड एसीचे ३३ बर्थ रिकामे होते.
उन्हाळ्याच्या सुटीतील १५ एप्रिल २१ रोजीची माहिती घेतली असता परळीतून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षणही रिकामेच होते.
औरंगाबादसाठी नो वेटिंग, हैदराबादसाठी नो वेटिंग
कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची संख्या रोडावली आहे. परळी परिसरातील रेल्वे प्रवाशांचा संपर्क जास्तीत जास्त औरंगाबाद, पुणे, हैदराबाद शहरासाठी येतो. या शहरासाठी जाणाऱ्या रेल्वेचे आरक्षण रिकामेच आहे.
परीक्षेनंतर रिकामेच
सर्वसाधारणपणे सर्व परीक्षा ह्या एप्रिलमध्ये संपूण जातात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत जाण्यासाठी बस आणि रेल्वेंना तुफान गर्दी असते. दुसरे म्हणजे लग्नसराईचा हा काळ असतो. कोरोनामुळे विवाहातील गर्दीस प्रतिबंध घातल्यामुळे विवाह देखील अतीशय साधेपणाने होत आहेत. पर्यायाने रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे.
पनवेल- नांदेड,. नांदेड - पनवेल या परळी मार्गे धावणाऱ्या रेल्वे प्रवाशी गाड्या भिगवन येथे चालू असलेल्या कामा मुळे ३१ मार्चपर्यंत बंद आहेत ३१ मार्च नंतर ही रेल्वे सुरू होणार आहे. सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्यापही चालू झाल्या नाहीत व आहे त्या गाड्यांना प्रवाशांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
रोज १० रेल्वे
n परळी मार्गे शिर्डी- काकीनाडा
n काकीनाडा शिर्डी,
n बंगळरू-नांदेड,
n नांदेड- बंगळरू
n औरंगाबाद- हैद्राबाद
n हैदराबाद- औरंगाबाद
n पनवेल- नांदेड
n नांदेड-पनवेल
n कोल्हापूर- धनबाद
n धनबाद -कोल्हापूर
सद्या पनवेल-नांदेड-पनवेल बंद आहे.
===Photopath===
240321\24bed_18_24032021_14.jpg
===Caption===
प्रवासीच नसल्याने रेल्वे आरक्षण रिकामेच