शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

बीडच्या आणखी जवळ आली रेल्वे; आष्टी ते अंमळनेर मार्गावर रेल्वेची हायस्पीड चाचणी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 7:23 PM

अंमळनेरकरांनी अनुभवला रेल्वेत बसण्याचा अनुभव

- नितीन कांबळेकडा: बीड जिल्हा वासियांच्या जिव्हाळ्याच्या विषय असलेल्या बीड-नगर-परळी रेल्वेबाबत  आणखी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. नगर ते आष्टी या मार्गानंतर आता आष्टी ते अंमळनेर या तीस किलोमीटरच्या मार्गाचे काम देखील पूर्ण झाले आहे. आज दुपारी या मार्गावर ताशी ११० किमी वेगाने रेल्वेची हायस्पीड चाचणी यशस्वी झाली. यामुळे आता बीडच्या आणखी जवळ रेल्वे आली आहे.

आष्टी ते अंमळनेर या ३० किलोमीटरच्या मार्गावर ११० किलोमीटर प्रति तास या वेगाने हायस्पीड चाचणी यशस्वी झाली. रेल्वे दाखल झाल्याने अंमळनेरकरांनी आनंद व्यक्त केला. रेल्वे पाहण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने अनेकांनी बोगीत बसून फोटो काढले. रेल्वे पाहण्यासाठी अंमळनेरसह परिसरातील ग्रामस्थांनी स्टेशनवर मोठी गर्दी केली होती. आता येथून बीडचे अंतर ७० किमीच राहिले असल्याने जिल्हावासीयांमध्ये आनंद पसरला आहे.

दरम्यान, अंमळनेर रेल्वे स्थानकावर रेल्वे पाहण्यासाठी लोकांची वाढती गर्दी पाहता व त्या ठिकाणी काही अनूसुचित प्रकार ,घटना घडू नये म्हणून अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस  निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांचे बारकाईने लक्ष होते. रेल्वेमुळे अंमळनेरचे नाव आता देशाच्या पर्यटन मार्गावर आल्याने वैभवात भरच पडल्याच्या भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीडRailway Passengerरेल्वे प्रवासी