लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : शहर व परिसरात शनिवारी पहाटे व दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी नद्या व नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
अंबाजोगाई तालुक्यात रविवारी पहाटे दुपारी जोरदार पाऊस झाला.
पावसापूर्वी वारे वाहत होते. वारे थांबताच मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. हा पाऊस तालुक्यात सर्वदूर होता. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पेरणीपूर्वी झालेल्या या पावसामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. अनेक वर्षांनंतर रोहिणी नक्षत्रात एवढा मोठा पाऊस पडल्याचे बोलले जात आहे. लवकर पाऊस सुरू झाल्याने पेरणीपूर्व मशागत व इतरही कामे रखडली आहेत.
===Photopath===
050621\avinash mudegaonkar_img-20210605-wa0076_14.jpg
===Caption===
अंबाजोगाई शहर परिसरात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाने नद्या, नाल्यांमध्ये पाणी साचल आहे.