शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्हाभरात पाऊस ७९ टक्के, धरणांमध्ये पाणीसाठा केवळ १८ टक्केच

By शिरीष शिंदे | Published: October 02, 2023 6:42 PM

धरण क्षेत्र परिसरात पाऊस झाला नसल्याचा परिणाम

बीड : मान्सूनचा चार महिन्यांचा हंगाम संपला असून या कालावधीत एकूण ७९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील १४३ लहान-माेठ्या पाणीसाठा प्रकल्पात केवळ १८ टक्केच पाणीसाठा झाला आहे. सरासरीच्या तुलनेत झालेला बहुतांश पाऊस हा मुर स्वरुपाचा असल्याचे मानले जात आहे. धरण क्षेत्र परिसरात पाऊस झाला नसल्याने पाणीसाठा अत्यल्प झाला असल्याचा अंदाज आहे. आता, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे डोळे परतीच्या पावसाकडे लागले आहेत.

जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या. जुलै महिन्याच्या अखेरीस बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली होती. परिणामी याच काळात पेरणीची टक्केवारी वाढली. बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात २०२३-२४ मध्ये एकूण ७ लाख ८२ हजार ३०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही पेरणी जिल्ह्याच्या सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९९.५६ टक्के आहे. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, मूग व उडीद पिकाची उत्पादकता घटण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली होती. दरम्यान, गणपती बाप्पांच्या आगमनानंतर पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर चांगल्या पावसाला सुरुवात झाली. मुर स्वरूपाच्या पावसाने सरासरी पावसाची टक्केवारी ५० टक्क्यांवरून थेट ७९.१ टक्क्यांवर जाऊन पाेहोचली. हा पाऊस पिकांना जीवनदान देणारा ठरला. परंतु धरणांसाठी लाभदायक ठरला नाही.

आता परतीच्या पावसावर मदारमागील काही वर्षांचा मागोवा घेतला तर परतीच्या पावसाने सर्व धरणे काही दिवसांत किंवा एकाच दिवसात भरून गेल्याचे लक्षात येईल. २०१६-१७ मध्ये बीडमध्ये एकाच रात्री झालेल्या पावसामुळे सर्वच्या सर्व धरणे भरून गेली असल्याचा अनुभव बीडकरांना आहे. आतापर्यंत चांगला पाऊस झाला तरी पाणीसाठा नसल्याची परिस्थिती परतीच्या पावसामुळे बदलून जाऊ शकते असा विश्वास अनेक शेतकऱ्यांना आहे. केवळ बीड जिल्हाच नाही तर राज्यात परतीच्या पावसाचा मोठा प्रभाव असतो.

प्रकल्प-उपयुक्त पाणीसाठा (दलघमी)-टक्केवारी

माजलगाव-परळी विभाग-३९.२००-१२.५६

बीड विभाग-८.८८४-३३.९५

परळी विभाग-२१.८८-२७.३९

मध्यम प्रकल्प-१७.१४२-३७.३९

लघु प्रकल्प-१९.५२३-४४.८७

सर्व प्रकल्प- १३२.६१२-१८.५३

 

आतापर्यंत झालेला पाऊस

तालुका-वार्षिक सरासरी-आतापर्यंतचा पाऊस-टक्केवारी

बीड-५९४.५-४२३.३-७०.९

पाटोदा-५३८.७-४३०.७-७९.७

आष्टी-५४६.१-५१४.२-९३.७

गेवराई-५८७.०-३६२.४-६१.५

माजलगाव-६१६.९-४३४.९-७०.२

अंबाजोगाई-६३२.४-६०१.४-९४.७

केज-५८३.६-५६५.७-९६.६

परळी-६२८.१-३६८.४-५८.४

धारुर-६६९.८-४६८.४-६९.७

वडवणी-६००.७-३६०.५-५९.८

शिरुर-५१५.६-३९४.७-७६.२

एकूण-५६६.१-४४९.२-७९.०

 

बिंदुसरा धरणात १९ टक्के पाणीसाठा

माजलगाव प्रकल्पात १२.५६ टक्के, तालुक्यातील पाली येथे बिंदुसरा धरणात सद्स्थितीला १८.९१ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. शिरुर तालुक्यातील सिंदफणा प्रकल्पात ५७.३७ टक्के तर पाटोदा तालुक्यातील महासांगवी प्रकल्पात ५६.३९ टक्के पाणीसाठा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

 

टॅग्स :RainपाऊसBeedबीडDamधरण