गेवराई : रविवारी सुटीच्या दिवशी रक्षाबंधन असल्याने मंगळवारी शहरातील द केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून पोस्टर बनवले आणि शाळेच्या आर्ट गॅलरीचे सुशोभिकरण केले. शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी राखी बांधून आणि चॉकलेट वाटून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.
अनेक दिवसांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शाळेत साजरे होणारे विविध उपक्रम बंद झाले होते. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कलागुणांचा विकास होऊन सामाजिक जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते, असे मत शाळेच्या संचालिका डॉ. वर्षा मोटे यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापक डॉ. आदित्य जोशी यांनी पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे शुद्ध पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षांचे महत्त्व स्पष्ट केले. कोरोनाचे सर्व नियम पाळून रक्षाबंधन साजरे केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. आर. मोटे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. उपप्राचार्य विजयकुमार खरात यांनी वेगवेगळ्या भारतीय उत्सवांचे महत्त्व समजावून सांगितले. सूत्रसंचालन राहुल जाधव यांनी केले. सुशील टकले यांनी आभार मानले. यावेळी गणेश नन्नवरे, लहू राठोड, अक्षय वांजोळे, विलास घोरतळे, सचिन अंभग, ओमकार दहिवाळ, अनुप डांगे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
240821\sakharam shinde_img-20210824-wa0008_14.jpg