लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी मंगळवारी आडस ते केज तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढून केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली .पावसाळी हंगाम संपत आलेला आहे. अद्यापपर्यंत पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील खरीपाची उभी पिके करपली आहेत. खरीपाची पिके हातची गेली असल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकºयांच्या पाल्यांची शैक्षणिक शुल्कमाफ करावे. आदी मागण्यांसाठी आडस ते केजपर्यंत शेतक-यांनी पायी मोर्चा काढला. सकाळी नऊ वाजता आडस येथून निघालेला पायी मोर्चा दुपारी साडेतीन वाजता केज तहसील कार्यालयावर धडकला.या मोर्चात राम माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे, महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, पंचायत समतिी सदस्य उमाकांत भुसारी, दत्तात्रय ठोंबरे, शिवाजी खडके, बालासाहेब केकाण, विजयकुमार सारडा, राम नखाते, अशोक जाधव, शाम गंगात्रे, मोहन तोडकर, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. तहसीलदार संजय वारकड यांनी मोर्चेकरी शेतक-यांचे निवेदन स्विकारले.
आडस ते केजपर्यंत ६ तास पायी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 1:22 AM