कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दीर व धार्मिक स्थळांवर गर्दी होऊ नये व होणाऱ्या गर्दीमुळे संसर्ग वाढू नये यासाठी सर्वच मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, मंदिरातील पुजाऱ्यांनाच दैनंदिन पूजाअर्चा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. शहर व परिसरातील गर्दी होणाऱ्या सर्वच मंदिराबाहेर मंदिर बंद असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. बुधवारी श्रीराम जन्मोत्सव रामनवमी उत्सव अंबाजोगाई शहरातील खडकपुरा परिसर व मंडी बाजार परिसरात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या उत्सवाला अडीचशे वर्षांची परंपरा आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राममंदिरात जन्मोत्सव मठाधिपतींनी भाविकांविना साजरा केला. तर शहरातील भाविकांनी ही आपल्या घरात राहून उत्सव साजरा करणे पसंद केले.
===Photopath===
210421\avinash mudegaonkar_img-20210420-wa0065_14.jpg