लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तलवारीचा धाक दाखवत कापड व्यापाऱ्याला एक लाख रूपयांची खंडणी मागणा-या दोघांना माजलगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या चार तासांत बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एक तलवारही जप्त करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी दुपारी माजलगाव बसस्थानकासमोर घडली.ज्ञानेश्वर अशोक विघ्ने (२२), अनिल कचरू कांबळे (१९ रा. ब्राह्मणगाव, ता. माजलगाव) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. माजलगाव बसस्थानकासमोर प्रशांत प्रभाकर होके यांचे कपड्याचे दुकान आहे. विलास सखाराम शिंदे हे तिथे व्यवस्थापक आहेत. सोमवारी दुपारी ज्ञानेश्वर व अनिल हे दोघे तिथे आले. त्यांनी मालक कोठे आहे, असे म्हणत एक लाख रूपयांची खंडणी मागितली. शिंदे यांनी हा प्रकार होके यांना सांगताच त्यांनी पलायन केले. ही माहिती पोनि सय्यद सुलेमान यांना मिळाली. त्यांनी पोउपनि एस.एच. बिराजदार, एस.बी.शेटे, एस.जे.पवार यांचे पथक आरोपींच्या शोधार्थ पाठविले. किट्टी आडगाव येथे सापळा रचून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुलेमान व त्यांच्या टीमने केली. माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
व्यापाऱ्याला मागितली लाखाची खंडणी; दोघांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:38 AM