बीड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम चार वर्षांपासून सुरू आहे. अद्याप संपूर्ण काम झालेले नसताना या महामार्गावरील पाडळिसंगी येथील टोलनाका सुरू करण्याचा घाट घातला आहे. सर्व्हीस रोड आणि मावेजासाठी राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाली शनिवारी सकाळी रास्तारोको करण्यात येणार आहे.रामनगर बीड बायपासच्या चौफुला महालक्ष्मी चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संदीप क्षीरसागर, बबन गवते, गंगाधर घुमरे यांनी केले आहे. एडशी- औरंगाबाद रस्त्याचे चौपदीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग यांच्या माध्यमातून खासगी कंपनी करत आहे. रस्त्याचे काम होत असताना बीड बायपासला सर्व्हीस रस्ता केला नाही. बायपासची उंची सहा मीटर आठ उंच असल्याने शेतकऱ्यांंना, सर्वसामान्य वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ज्या शेतकऱ्यांंच्या जमिनी महामार्गामध्ये गेल्या त्यांना अद्याप पूर्णपणे मावेजा मिळालेला नाही. या प्रश्नी ९ मार्च रोजी सकाळी दहा वाजता माजी आमदार राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, अॅड.डी.बी.बागल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात येणार आहे.गडकरी, फडणवीसांनाही देणार निवेदन४सर्व्हीस रस्ता, मावेजा द्या आणि मगच पाडळिसंगी येथील टोलनाका सुरू करा नसता गंभीर परिणाम भोगावे लागतील. या प्रश्नी आम्ही न्यायालयातही जाऊ असे निवेदन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांना निवेदन देऊन कायदेशीर बाजू मांडत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे, प्रशासनाचा दबाव झुगारून रस्त्यावर उतरणार, असे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.
सर्व्हीस रोड, मावेजासाठी आज बीडमध्ये रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 12:00 AM