बीड : शिधापत्रिका धारकांचे उत्पन्न १ लाखाहून अधिक असल्यास त्यांचे रेशनकार्ड रद्द होणार नाही. केशरी किंवा लाभार्थी रेशनकार्ड असणारे व ज्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे. त्यांचे कार्ड पांढऱ्या रंगाचे होणार आहे. म्हणजे, कार्डामार्फत मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेमध्ये त्यांना समाविष्ट केले जाणार नसल्याने त्यांचे धान्य बंद होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी दिली आहे.
जिल्ह्यात अपात्र शिधा पत्रिकाधारकांची शोधमोहीम १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. कार्ड तपासणी प्रक्रिया सुरू असून, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. स्थापन करण्यात येणाऱ्या समितीवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. ज्यात शोधमोहिमेंतर्गत शिधापत्रिका तपासणीची कार्यपद्धती ठरवणे, खासगी किंवा सरकारी कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीकडे जर लाभार्थी किंवा केशरी शिधापत्रिका असेल मात्र त्यांचे उत्पन्न १ लाखाच्यावर असेल, तर त्याची केशरी शिधापत्रिका रद्द करून त्याजागी श्वेत शिधापत्रिका देण्याची जबाबदारी दिली आहे.
तर रेशनकार्ड रद्द होईल
कार्डधारकांना आवश्यक ते पुरावे सादर करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाईल. मात्र, तरीही संबंधित लाभार्थ्यांनी ते देण्यास असमर्थता दाखवली तर, रेशनकार्ड रद्द करण्यात येईल. तसेच पुराव्याची तपासणी करताना काही संशयास्पद आढळल्यास रेशनकार्ड रद्द केले जाईल.
हे पुरावे आवश्यक
भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, विजेचे देयक, टेलिफोन देयक, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, आदी पुरावे आवश्यक आहेत.
या कारणामुळे रेशनकार्ड रद्द होईल
खासगी किंवा सरकारी कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीकडे जर लाभार्थी किंवा केशरी शिधापत्रिका असेल मात्र त्यांचे उत्पन्न १ लाखाच्यावर असेल तर त्याची केशरी शिधापत्रिका रद्द केली जाईल.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तयार करण्यात येणार आहे. अद्याप शासनाकडून तसेच निर्देश आले नसल्याचे सांगण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. लवकरच समिती स्थापन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यामध्ये तालुकास्तरावरील पुरवठा विभागातील मनुष्यबळानुसार गरज असेल तर, इतर विभागातील काहीजणांचा समावेश समितीमध्ये केला जाणार आहे. लवकरच ही समिती स्थापन होईल
संतोष राऊत निवासी उपजिल्हाधिकारी बीड
अंत्योदय कार्डधारक - ४०,२४९
केशरी रेशनकार्ड - १४,९३,०७६
एपीएल शेतकरी योजना - ५,४२,५५९