माजलगाव
: लॉकडाऊन काळात तोंडाला मास्क लावणे, संचारबंदी काळात परवानगी नसताना दुकाने सुरू ठेवणे यासह विविध कारणासाठी दंडाची आकारणी करण्यासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून दंड वसुलीसाठी देण्यात येणाऱ्या पावत्यांवर कुठली नगरपरिषद आहे याचा उल्लेख नाही. यावर शिक्का देखील नसल्याने या देण्यात येणाऱ्या पावत्या बोगस असल्याची चर्चा दिसून येत आहे.
सध्या शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जाहीर केली असून याकाळात जीवनावश्यक वस्तू दुकाने उघडी आहेत. या जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी जनतेला रस्त्यावर जाता- येता येतांना वेगवेगळे नियम आहेत. या काळात प्रत्येक नागरिकाने आपल्या तोंडाला मास्क लावलाच पाहिजे अन्यथा हा नियम न पाळणाऱ्यास नगर परिषदेच्या पथकाकडून दंडाची कारवाई करण्यात येते.
यासाठी नगर परिषदेने पथके नियुक्त केली आहेत. मात्र या पथकाकडे दंड वसुली करतांना ज्या पावत्या दिल्या जात आहेत बोगस असल्याची चर्चा आहे. १५ एप्रिल रोजी नगरपालिकेचे एक वसुली पथक मोंढा भागात फिरत असताना या भागातील एक व्यापारी यांनी तोंडास मास्क लावलेला होता, त्यांनी आपल्याला तहान लागल्याने खुर्चीवर बसल्या बसल्या खाली वाकून पाण्याची बाटली उचलून मास्क खाली केला व तोंडाला लावली व पाणी पिऊन ती बाटली खाली ठेवत असतानाच या पथकातील कर्मचारी तेथे पोहोचले व त्यांनी तुम्ही मास्क तोंडाच्या खाली लावलेला आहे असे म्हणून दोनशे रुपये दंडाची पावती फाडून त्यांच्याकडून पैसे वसूल केले. मात्र पावतीवर नगरपरिषदेच्या नावाचा किंवा शिक्क्याचा कुठेही उल्लेख नाही. केवळ नगरपालिका सर्वसाधारण पावती एवढेच छापील आहे. खाली सही करणाराचे नाव देखील नाही तसेच ज्याचे नावे पावती फाडली आहे त्याचे संपूर्ण नावाचा उल्लेख नाही, अशाप्रकारे दंडाची वसुली करण्यात येत असल्याने सदर पावती बुक बोगस असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यावर दररोज हजारो रुपयांची वसुली बेकायदेशीरपणे करण्यात येत असल्याचा गोरखधंदा सर्रासपणे सुरू आहे.
आपल्या नगर परिषदेकडे अशाप्रकारे नगरपरिषदचे नाव नसलेले पावती बुक नगरपालिकेने छापलेले आहे की नाही या बाबत माहिती घेऊन असा काही प्रकार होत असेल तर चौकशी करू.
- शेख मंजूर , नगराध्यक्ष.
दंड आकारण्यात आल्यानंतर त्या पावतीवर शिक्का आवश्यक आहे, हे बुक कोणास दिले आहे याची माहिती घेऊन त्याने शिक्के का मारले नाहीत याबाबत त्यास नोटीस बजावली जाईल.
-गणेश डोंगरे, कार्यालयीन अधीक्षक.
===Photopath===
160421\purusttam karva_img-20210415-wa0063_14.jpg