शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

जिल्हा रूग्णालयात रुग्णांकडून पैसे घेतले; सफाईगार महिला निलंबित

By सोमनाथ खताळ | Published: July 18, 2023 10:52 PM

ही कारवाई डॉ. सुरेश साबळे यांनी मंगळवारी रात्री उशिरा केली.

सोमनाथ खताळ, बीड : जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागातील सफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांकडून पैसे घेतले. याचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. याची चौकशी केल्यानंतर यातील एक महिला गंभीर दाेषी आढळल्याने तिला निलंबीत केले. तर दुसरीची वडवणी तालुक्यातील चिंचवण ग्रामीण रूग्णालयात तडकाफडकी बदलीत केली. ही कारवाई डॉ. सुरेश साबळे यांनी मंगळवारी रात्री उशिरा केली.

जोहराबी शेख कासीद असे निलंबित केलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर कौशल्य विठ्ठलराव काळे यांची बदली करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात प्रसुती झाल्यानंतर रूग्ण व नातेवाईकांकडून पैसे घेण्याची जणू प्रथाच झाली आहे. या विभागातील महिला कर्मचारी रुग्णांसह नातेवाइकांकडून पैसे घेत असल्याचा एक कथित व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर डॉ. साबळे यांनी एका पथकामार्फत चौकशी केली. या पथकाने अहवाल देताच गुरुवारी रात्री उशिरा एका महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली तर दुसरीची बदली केली. यामुळे असे पैसे घेणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, जोहराबी यांना पाटोदा मुख्यालय देण्यात आले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल