लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आजपासून पोलीस भरतीस सुरूवात होत आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही संपूर्ण भरती कॅमेºयांच्या निगराणीत होणार आहे.
यावर्षी ५३ जागांसाठी तब्बल आठ हजार ३२१ अर्ज आले आहेत. जागा जरी कमी असल्या तरी पोलीस भरतीकडे युवकांचा ओढा असल्याचे स्पष्ट होते. इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार असल्याने भरती प्रक्रियेत कोठेही गडबड गोंधळ होणार नाही, या दृष्टीने आठवडाभरापासून जिल्हा पोलीस दल तयारी करीत आहे.
उमेदवारांच्या पोटाला आरएफआयडी चिपपोलीस मुख्यालय आणि पोलीस वसाहतीच्या परिसरातील मैदानावर ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच बीडमध्ये धावणाºया उमेदवारांच्या पोटाला आरएफआयडी चिप असणार आहे. यामुळे मनुष्यबळ तर कमी लागणारच आहे, शिवाय उमेदवाराने किती वेळात अंतर पार केले, हे तात्काळ समजण्यास मदत होणार आहे. ही सुविधा ८०० व १६०० मिटरसाठी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बायोमेट्रीकद्वारे ठेवली जाणार नोंदभरतीसाठी येणाºया उमेदवारांची बायोमॅट्रीकद्वारे नोंद केली जाणार आहे. यामुळे अनेक गैरप्रकारांना आळा बसणार आहे. बीड पोलिसांनी ही सुविधा हाती घेतल्यामुळे समाधान आहे.
एलसीबीचे पथक तैनातपोलीस मैदान परिसरात खाजगी व्यक्तींना प्रवेश बंद आहे. तसेच गैरप्रकारांना निमंत्रण देणाºयांवरही पोलिसांची नजर असणार आहे. यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच कर्मचाºयांचे विशेष पथक याठिकाणी नियूक्त केले असून ते साध्या कपड्यांमध्ये बंदोबस्तावर असणार आहेत.
सीसीटीव्ही कॅमे-यांची राहणार नजरदोन मैदानावर होत असलेल्या या भरती प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर राहणार आहे. महत्त्वाच्या सर्व ठिकाणी कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. यासोबतच व्हिडीओ कॅमेरे हाती घेऊन कर्मचारी बंदोबस्तावर तैनात करण्यात आलेले आहेत.अधीक्षकांकडून सूचना : कर्तव्यास कसूर करणाºयांवर कारवाईरविवारी दुपारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी स्वत: अधिकारी, कर्मचाºयांशी संवाद साधला. बंदोबस्त वाटप वेळी त्यांनी घ्यावयाची काळजीबद्दल मार्गदर्शन करून काही सुचना केल्या.एवढेच नव्हे तर कर्तव्यात कसूर करणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती होती. कलुबर्मे, बो-हाडे यांनीही यावेळी बंदोबस्तावरील अधिकारी - कर्मचा-यांना सूचना केल्या.