बीड : खरीप हंगामातील पिके हाती आलेली असतानाच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. कोंब फुटल्याने व काळवंडल्याने ही पिके नाफेडच्या निकषात पात्र ठरणार नसल्याची मानिसकता बनल्याने जिल्ह्यातील शेतक-यांनी माल विकण्यासाठी नोंदणीदेखील केली नाही. दोन महिन्यात केवळ ६७ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. यात ५६ शेतकºयांनी मूग विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यावरु न सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे. तर आहे तो माल विकण्याची चिंता शेतकºयांना आहे.शाासकीय हमीदराने खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी केंद्र निश्चित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ९ केंद्रांवर यासाठी १५ सप्टेंबरपासून नोंदणी सुरु केली होती. जून ते सप्टेंबर कालावधीत अनियमित पाऊस झाला तरी पिके जोमात होती. दरम्यान आॅक्टोबरमध्ये जिल्ह्यात सर्वच तालुक्यात अवेळी आणि मुसळधार पाऊस झाला. या पावसाने हाती आलेला घास हिरावला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. यात सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. पावसाच्या तडाख्यानंतर शेतीाकामात शेतकरी आहेत. भिजलेली, काळवंडलेली पिके असल्याने हा माल कोणी घेणार नाही अशी स्थिती आहे. त्यात ही पिके आता नाफेडचे निकष पूर्ण करु शकणार नाहीत. त्यामुळे शेतक-यांनी नोंदणीकडे पर्यायाने नाफेडला माल विकण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील ९ केंद्रांवर दोन महिन्यात केवळ ६७ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. सर्वत्र प्रतिसाद कमी मिळाल्याने तसेच शेतक-याच्या अडचणी लक्षात घेऊन नाफेडने खरेदीसाठी १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. परंतु खरीप हंगामातील उत्पादनाची एकूण परिस्थिती लक्षात घेता शेतकरी मोठ्या संख्येने नोंदणी करतील असे चित्र सध्यातरी नाही.मुगासाठी बीडमध्ये सर्वाधिक नोंदणीमूग विक्रीसाठी नाफेडच्या बीड केंद्रावर ४४ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. अंबाजोगाई, माजलगाव, धारुर येथे प्रत्येकी एक तर परळीत ९ शेतक-यांनी नोंदणी केली आहे.चार तालुक्यातील नोंदणी निरंकसोयाबीनसाठी बीडमधून ८ तर माजलगावात २ अशा १० शेतक-यांनी नोंदणी केली आहे. तर केवळ परळीत उडीद विक्रीसाठी एका शेतक-याची नोंदणी आहे. गेवराई, शिरुर, आष्टी, पाटोदा येथे एकाही शेतक-याची नोंदणी झालेली नाही.सोयाबीनचा दर्जा खराबपावसामुळे सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात भिजले आहे. आर्द्रता, डागी आणि माती या शर्तीवर २२०० ते ३५०० पर्यंत भाव असलातरी खरेदीदार सावधतेने खरेदी करत आहेत. सध्या धुळे, लातूर, सोलापूर, सांगली भागातील प्लान्टकडून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ३८०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
नाफेडच्या ९ केंद्रांवर केवळ ६७ शेतकऱ्यांकडून नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:53 PM
खरीप हंगामातील पिके हाती आलेली असतानाच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. कोंब फुटल्याने व काळवंडल्याने ही पिके नाफेडच्या निकषात पात्र ठरणार नसल्याची मानिसकता बनल्याने जिल्ह्यातील शेतक-यांनी माल विकण्यासाठी नोंदणीदेखील केली नाही.
ठळक मुद्देमुगासाठी ५५ , सोयाबीनसाठी १० शेतकऱ्यांची नोंदणी : दोन महिन्यांत अल्प नोंदणी; १५ डिसेंबरपर्यंत नोंदणीसाठी मिळाली मुदतवाढ