बीड : दोन दिवसापुर्वी बीड शहरातील थिगळे गल्ली येथे एका २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली होती. मात्र, ‘आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तीची हत्या केल्याचा’ आरोप करत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व योग्य ती चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांसह संपूर्ण गावातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी ठिय्या आंदोलन केले.रविवारी बीड शहरातील थिगळे गल्ली परिसरातील रहिवासी दिपाली रोहित शिराळे (वय २३ ) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच दिवशी जिल्हा रुग्णालाय मुलीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात झाल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईंकानी केला होता. मात्र, पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करुन घेण्यात आला नव्हता. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. ही हत्या असून आमच्या मुलीला न्याय द्या या मागणीसाठी संपुर्ण शिवणी गावातील महिला व पुरुष एकत्र आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.भावाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बहिण दिपालीचा विवाह रोहित मारोती शिराळेसोबत यावर्षी २६ एप्रिल रोजी झाला होता. लग्नात संसारोपयोगी सर्व वस्तू व नगदी ५ लाख रुपये हुंडा दिला होता. लग्नानंतर एक महिना सर्वकाही सुरळीत होते.दरम्यानच्या काळात गरोदर राहिली होती. ‘एवढ्या लवकर तुला दिवस कसे काय गेले’ म्हणून तिच्या चरित्र्यावर संशय घेण्यास सासरच्यांनी सुरुवात केली होती, तिला मारहाण केल्यामुळे व छळामुळे गर्भपात देखील झाला होता. घरातून हाकलून देण्यात आले. तसेच घरबांधकामासाठी ५ लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत होते. मात्र, परिस्थिती सुधारेल असे समजून त्यांची समजूत काढत होतो.२० जुलै रोजी बोलणेदेखील झाले होते, त्यानंतर दुसºयाच दिवशी तिने आत्महत्या केल्याचा फोन आला. मात्र, ही आत्महत्या नसून सासरच्या लोकांनी हत्या केली असून तिच्या रुग्णालयातील कागदपत्रात एक चिठ्ठी सापडलेली असून कसा छळ केला जात होता याविषयी पोलिसांना माहिती दिल्याचे या निवेदनात नमूद आहे. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात कलम ३०६, ३१३, ३०४(ब) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. मात्र, खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांसह शिवणी ग्रामस्थांनी केली आहे.विजय कबाडे यांच्या आवाहनानंतर आंदोलन मागे‘तुमची मुलगी आणि आमची मुलगी सारखीच आहे’ गुन्हा दाखल करुन घेतलेला असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे आंदोलन मागे घेऊन गावाकडे जावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी केले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
विवाहितेची आत्महत्या नव्हे, हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:48 PM
दोन दिवसापुर्वी बीड शहरातील थिगळे गल्ली येथे एका २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली होती. मात्र, ‘आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तीची हत्या केल्याचा’ आरोप करत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व योग्य ती चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांसह संपूर्ण गावातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी ठिय्या आंदोलन केले.
ठळक मुद्देखुनाचा गुन्हा दाखल करा : पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन