शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

देवाला सोडलेल्या १२ मुलांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 3:45 AM

बीडसह, लातूर, परभणी, सोलापूरमधील मुलांचा समावेश

बीड : अंधश्रद्धेपोटी देवाला सोडलेल्या ७ मुली व ५ मुले अशा १२ मुलांची सुटका करण्यात आली. ही मुले बीडसह, लातूर, परभणी, सोलापूरमधील रहिवासी आहेत. बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाटावरील पोईच्या देवाजवळ शुक्रवारी दिवसभर हे ‘रेस्क्यू आॅपरेशन’ पार पडले.बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाटावर पोईचा देव म्हणून एक परिसर आहे. येथे कृष्ण मंदिर असून विविध १३ आश्रम आहेत. येथे महाराज लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. येथे आढळलेली व सध्या १५ वर्षांची असलेली सोलापूरची मुलगी सहा महिन्यांची असताना आई-वडिलांनी तिला या देवाच्या ठिकाणी आणून सोडले आहे. १५ दिवसांपूर्वी तिला नात्यातीलच एका ४० वर्षीय पुरूषाने फुस लावून पळवून नेले. मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. आठवड्यापूर्वी ती मुलगी त्याच्या तावडीतून सुटका करून परतली. पोलिसांनी तिला बालकल्याण समितीपुढे हजर केले. तिची अधिक चौकशी केली असता तिने आपल्याप्रमाणेच इतर मुलेही या आश्रमात असल्याचे सांगितले.ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर ‘रेस्क्यू आॅपरेशन’ राबविण्यात आले. यात त्यांना ७ मुली व ५ मुले आढळून आली. त्यांना बाल सुधारगृहात पाठविले जाईल, असे बालकल्याण समितीचे सदस्य तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले.