बीड : कोरोना संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ६४ लोकांचे सकाळी स्वॅब घेतले होते. त्यातील ५९ निगेटिव्ह आले असून ५ नाकारले आहेत. दुपानंतर एकही नवीन रुग्ण न सापडल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८८ कोरोनाबाधित सापडले असून पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. यात ६४ कोरोनामुक्त झालेले असून अद्यापही २२ जणांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी बीडमधील मसरत नगर भागातील कोरोनाबाधित व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेले तसेच काही नवीन अशा ६४ जणांचे स्वॅब घेतले होते. पैकी ६० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ५ स्वॅब तांत्रीक अडचणींमुळे नाकारण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. दुपानंतर एकही अहवाल पॉझिटिव्ह न आल्याने बीडकरांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर पालकमंत्री मुंडे यांच्या कुटूंबियांसह सुरक्षा रक्षक व इतर संपर्कात आलेल्या ३५ लोकांचे स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाला होता. या परळी शहरातील माधवबाग येथील एक ३५ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आला होता. ३ अहवाल नाकारले होते तर इतर सर्वच निगेटिव्ह आले होते. मुंडे यांच्या कुुटूंबियांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.