- नितीन कांबळे कडा ( बीड) : पावसाने दोन दिवसांपासून तालुक्यातील ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. अनेक दिवसानंतर समाधानकाक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पिके हातची गेली असली तरी आता पिण्यासाठी पाणीसाठा चांगला होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
आष्टी तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने आखाडते घेतल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला होता. पाण्या अभावी पिके हातची गेली. बाजरी, तुर, कपाशी पिकानी तग धरला. पण आता परतीच्या पावसाने कडा, दादेगांव, डोंगरगण, घाटापिंपरी,धामणगांव, देवळाली, बीडसांगवी, बावी, धानोरा,लोणी सय्यदमीर, अंभोरा,जळगांव,मांडवा, यासह तालुक्यात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागुन पाणीसाठा चांगला होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. बीडसांगवी गावच्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.