लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या १०० बिंदू नामावली नोंदवहीत झालेल्या अनियतिता आणि त्रुटींची दुरुस्ती करावी अशी मागणी करत खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले.
येथील जिल्हा परिषदेत शिक्षक संवर्गात खुल्या प्रवर्गातील ३०० पदे रिक्त आहेत. परंतू आरक्षित प्रवर्गातून निवड आणि बदली झालेली शेकडो पदे प्रचलित बिंदूनामावलीत विविध गैरमार्गांनी खुल्या प्रवर्गावर टाकली आहेत. त्यामुळे खुला पवर्ग ५०० च्या ंसंख्येने अतिरिक्त दर्शविलेला आहे. यामुळे बिंदूनामावलीचा भंग तसेच आरक्षण अधिनियमांचे उल्लंघन होत आहे. परिणामी खुल्या प्रवर्गातील पात्र आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक व पात्र सुशिक्षित बेरोजगार भावी शिक्षक हे या हक्कांच्या पदापासून प्रदीर्घ काळासाठी वंचित राहत आहेत. मात्र प्रशासनाने अद्याप या प्रकरणी लक्ष न घातल्याने खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केल्याचे अरुण पवार, महेश झणझणे, अमृता जैन, वैभव घोडके, संजय चव्हाण, शिवराज जरे, जयंत आमटे म्हणाले.
६०० पुराव्यांसह पाठपुरावाखुला कर्मचारी प्रवर्ग संघाने त्यांच्या मागण्या व हक्कासाठी मागील सहा महिन्यांपासून जवळपास ६०० आक्षेप पुराव्यांसह जिल्हा परिषद प्रशासन व औरंगाबाद मा. व. क. यांच्याकडे नोंदवून तात्काळ रोस्टर दुरुस्ती व वस्तुनिष्ठ पुनर्रचनेची सतत मागणी केली आहे.