बीड : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी राजापूर येथील वाळू पट्ट्यात कारवाई करून मोठ्याप्रमाणात वाळू साठा जप्त केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील अवैध वाळू साठा व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. मात्र, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व गौणखनिज अधिकारी आनंद पाटील यांची बदली होताच इतर यंत्रणेच्या जोरावर अवैध वाळू वाहतूकीचा रात्रीचा खेळ पुन्हा सुरु झाल्याची माहिती आहे.जिल्हाधिकारी पाण्डेय यांची औरंगाबाद महानगरपालिका तर गौण खनिज अधिकारी आनंद पाटील यांची नाशिक येथे बदली झाली आहे. गेवराई तालुक्यातील राजापूर येथे जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी मोठी कारवाई केली होती. यादरम्यान येथील वाळू माफियांचे हस्तक असलेल्या स्थानिकांनी प्रशासकीय कर्मचाºयांवर हल्ला केला होता. मात्र, त्यांचा विरोध न जुमानता ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील अवैध वाळूसाठ्यावर निर्बंध आले होते.तसेच अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाºया टिप्परवर जीपीएस यंत्रणा देखील जिल्हाधिकाºयांनी लावली होती. यामुळे रात्री वाहतूक करणे बंद होते. याची स्क्रिन जिल्हाधिकारी कार्यालयात लावली होती. त्यामुळे एका जागेवर बसून नियंत्रण ठेवणे शक्य झाले होते. तसेच रात्रीच्या वेळी गौण खनिज अधिकारी आनंद पाटील हे देखील गस्त घालून वाळूच्या गाड्या पकडून कारवाई करत होते. त्यामुळे अवैध वाळू उपसा व वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. परंतु दोन्ही अधिका-यांच्या बदल्या झाल्याचे कळताच गुरुवार व शुक्रवारपासून रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक सुरु झाली आहे.महसूलचे अधिकारी गायबवाळू पट्ट्यातील अनेक महसूल कर्मचारी व पोलीस कर्मचाºयांचे स्वत:चे वाळू वाहतूक करणारे टिप्पर आहेत. परंतु, अवैध वाळू वाहतूक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी काही पथके नेमली होती. परंतु जिल्हाधिका-यांची बदली होताच ही पथके देखील गायब झाल्याचे चित्र आहे. गेवराई, बीड हद्दीतून मोठी अवैध वाळू वाहतूक होते. त्यावर निर्बंध आणण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई करण्याची मोहीम सुरु आहे. त्यासाठी नेमलेली पथके देखील कार्यरत आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.गाड्यांवरील जीपीएस पडले बंदवाळू वाहतूक करणाºया गाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली होती. मात्र, अवैध वाळू वाहतूक करताना आपला ठावठिकाणा कळू नये यासाठी अनेक टिप्परवर जीपीएस यंत्रणा निष्क्रिय करण्यात आली आहे.पिंपळनेर हद्दीतून सर्रास वाळू वाहतूक सुरुपिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतून राजरोजपणे वाळू वाहतूक केली जात आहे. परिसरातील काही ग्रामस्थांमधून याबाबत तक्रार देखील केली आहे. परंतु याकडे लक्ष दिले जात नाही, तसेच वाळू वाहतूक करणाºयांना पोलिसांकडून अभय दिले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली अन् अवैध वाळूचा खेळ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 12:28 AM
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व गौणखनिज अधिकारी आनंद पाटील यांची बदली होताच इतर यंत्रणेच्या जोरावर अवैध वाळू वाहतूकीचा रात्रीचा खेळ पुन्हा सुरु झाल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देयंत्रणा सज्ज असताना देखील होते अवैध वाळू वाहतूक । जीपीएस निघाले बाजूला