बीड : जुलै व आॅगस्ट २०१९ तसेच सप्टेंबर ते आॅक्टोबरमधील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे ३३ टक्के किंवा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना सदर पिकासाठी घेतलेल्या पीक कर्जाची माफी व पीक कर्ज न घेतलेल्या शेतकºयांना १ हेक्टेरच्या मर्यादेत केंद्रीय आपत्ती निवारण सहायता कोष तसेच राज्य आपत्ती निवारण सहायता कोषच्या दराच्या तिप्पट दराने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी बाधित शेतक-यांना पीक नुकसानीसाठी मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेचा तपशील व बाधित क्षेत्राची माहिती विवरण पत्रामध्ये तत्काळ पाठविण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.विवरण पत्रात या मुद्द्यांचा समावेशपेरणीखालील सामान्य क्षेत्र हेक्टर, चालू वर्षी पेरणी झालेले क्षेत्र हेक्टर, ३३ टक्के किंवा अधिक नुकसान झालेले बाधित क्षेत्र हेक्टर, बाधित शेतकरी संख्या, ६ हजार ८०० रु. प्रती हेक्टरप्रमाणे एक हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यासाठी आवश्यक रक्कम (लाखात), १३ हजार ६०० रु. प्रती हेक्टरप्रमाणे १ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यासाठी आवश्यक रक्कम, एकूण मदतीची रक्कम लाखात नमूद करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.कोरडवाहू, आश्वासित सिंचनाखालील क्षेत्र व बहुवार्षिक पिकाखालील क्षेत्र अशी वर्गवारी करण्यात येणार आहे.सरसकट कर्ज माफ करामागील तीन वर्षात बहुतांश शेतकºयांना पीक कर्ज मिळालेले नाही. हे शेतकरी संपूर्ण कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते. कर्जमाफी न झाल्याने या शेतकºयांकडील थकबाकी वाढत गेली. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कर्ज सरसकट माफ करावे, तसेच पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांनी केली.
अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:46 PM
बाधित शेतक-यांना पीक नुकसानीसाठी मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेचा तपशील व बाधित क्षेत्राची माहिती विवरण पत्रामध्ये तत्काळ पाठविण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
ठळक मुद्देबीड जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निर्देश बाधित क्षेत्राच्या माहितीसह मदत देण्यासाठी आवश्यक रकमेचा तपशील शासनाने मागविला