माजलगाव : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी तहसील कार्यालय येथे दुपारी २ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. यावेळी ९१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची सोडत झाली. यावेळी तालुक्यातील सरपंच, नागरिक, सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या आरक्षण सोडतीमध्ये ९१ गावांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण, तसेच अनुसूचित जाती महिला आरक्षण, अनुसूचित जमाती महिला आरक्षण, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण व सर्वसाधारण महिला आरक्षण असे त्यात महिला ४६, तर पुरुष ४५ ग्रामपंचायतींचे नेतृत्व करणार आहेत. ही सोडत सुरू करण्यापूर्वी मुंबई ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणूक नियम १९६४ च्या नियमातील तरतुदी सर्वांना समजावून सांगण्यात आल्या. तर १९९५ ते २०२० पर्यंत ग्रामपंचायत कोणत्या जागेसाठी राखीव होती ते ग्रामपंचायतनिहाय वाचून दाखविण्यात आले.
अनुसूचित जाती महिला एकदरा, काळेगावथड्डी, घळाटवाडी, लहामेवाडी, नागडगाव, शिंदेवाडी, पायतळवाडी, टालेवाडी, तर अनुसूचित जाती मंजरथ, सांडस चिंचोली, मनूरवाडी, गोविंदवाडी, सिमरी पारगाव, हरकी लिमगाव, मोठेवाडी, तर अनुसूचित जमातीसाठी दिंद्रुड ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये महिला गव्हाणथडी, खरात आडगाव, पुरुषोत्तमपुरी, महातपुरी, पिंप्री खुर्द, वारोळा, सुर्डी नजीक, बाभूळगाव, राजेवाडी, मनूर, साळेगाव, बारभाई तांडा यांचा समावेश करण्यात आला. नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये किट्टीआडगाव, पिंप्री खुर्द, महातपुरी, गव्हाणथडी, खेर्डा गुर्द, फुलपिंपळगाव, लवूळ, चिंचगव्हाण, मनूर, काळेगाव, ढेपेगाव, मंगरूळ यांचा समावेश आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५१ ग्रामपंचायत आरक्षण काढण्यात आले असून, त्यात सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायती पुनंदगाव, वाघोरा, पिंपळगाव नाखले, शहाजानपूर, खतगव्हाण, शिंपेटाकळी, रेणापुरी, ब्रह्मगाव, शहापूर मजरा, सरवर पिंपळगाव, सुरूमगाव, पात्रुड, देवखेडा, रोषणपुरी, गोविंदपूर, शिंदेवाडी-पात्रुड, सादोळा, निपाणी टाकळी, छोटेवाडी, तालखेड, शेलापुरी, हिवरा ब्रु., आनंदगाव, सोन्नाथडी, उमरी बु., गंगामसला.
सर्वसाधारण सरपंचपदासाठीचे आरक्षण छत्रबोरगाव, छोटेवाडी, शु. लिमगाव, डुब्बामजरा, ढोरगाव, मालीपारगाव, मोगरा, शिंपेटाकळी, गुंजथडी, फुलेपिंपळगाव, नित्रुड, रामपिंपळगाव, आबेगाव, सुलतानपूर, लोनगाव, सावरगाव, केसापुरी, तेलगाव खुर्द, सोमठाणा, लुखेगाव, वांगी बु., टाकरवण, रिधोरी, कोथरूळ, राजेगाव.
वरीलप्रमाणे सोडत काढल्यानंतर उपस्थितांना आरक्षण यादी वाचून दाखविण्यात आली. अशा रितीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्ग याचे आरक्षण काढण्यात आले. उपस्थितांपैकी कोणाचीही लेखी अथवा तोंडी तक्रार आली नाही. सर्व उपस्थितांचे आभार मानून तहसीलदार वैशाली पाटील यांनी सोडत जाहीर केली.