बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी १० दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याच अनुषंगाने लाॅकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही शहरात व ग्रामीण भागातील तलवाडा येथील व्यापाऱ्यांनी आपआपली दुकाने व व्यापारी पेठा कडकडीत बंद ठेवल्या आहेत. अत्यावश्यक कामासाठी निघालेला नागरिकांची पोलिसांनी चौकशी करून त्यांना जाण्यात परवानगी देत आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघालेल्या नागरिकांनी आपले काम करून आपल्या घरी लवकर जावे. याची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात व तालुक्यातील ठिकठिकाणी प्रशासन कामाला लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
तलवाडा येथील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर निघू नये तसेच गर्दी करू नये व मास्कचा वापर करावा, असे आवाहन तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे सांगितले.
( सोडता फोटो तलवाडा येथील व्यापारी पेठेतला आहे. )
===Photopath===
270321\sakharam shinde_img-20210327-wa0015_14.jpg
===Caption===
लॉकडाऊनला प्रतिसाद; तलवाडा कडकडीत बंद