लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लाडक्या बाप्पांना रविवारी निरोप देण्यात येणार आहे. या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागू न देता जल्लोष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यावर्षी पोलिसांकडून तर तगडा बंदोबस्त आहेच, शिवाय गणेश मंडळांवरही काही प्रमाणात सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्या मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांभाळावे लागणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास थेट मंडळ व कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.जिल्ह्यात १६२८ ठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आलेली आहे. ४४४ गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना यशस्वी ठरली. अनेक मंडळांनी दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच जनजागृती, मनोरंजनात्मक कार्यक्रमामुळे चैतन्य निर्माण झाले होते. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. पोलिसांनीही विशेष पथकांसह तगडा बंदोबस्त लावला आहे.दरम्यान, मंडळांची संख्या, उपद्रवी तरूण, गर्दी आदींचा विचार करून मंडळांसोबत पोलिसांनी बैठक घेतली. त्यांना नोटीसा बजावून विसर्जन मिरवणूकीत डॉल्बी वाजविणार नाही, मूर्तीची विटंबना होणार नाही, मद्यपी तरूण धिंगाना करणार नाहीत, नियमांचे उल्लंघन करणार नाही, असे लिहून घेतले आहे. नियमांचे उल्लंघन केले किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला तर थेट मंडळ व पदाधिकाºयांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे आता मंडळांवरच विसर्जन मिरवणुकीची जबाबदारी असणार आहे.तीन ठिकाणी बीडीडीएसकडून तपासणी४बीडसह परळी व अंबाजोगाई शहरात मोठ्या मिरवणूका निघतात. त्यानिमित्ताने बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सार्वजनिक ठिकाणांसह विसर्जन स्थळ, मिरवणूक मार्ग व इतर ठिकाणांची तपासणी केली आहे. तसेच रविवारीही दोन पथके नियुक्त केली असून ते विविध भागात अचानक भेटी देऊन तपासणी करणार आहेत.डीजे वाजला कीगुन्हा दाखल...न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत डिजेला बंदी घातली आहे. बीडमध्ये कोठे डिजे वाजला तर थेट डिजे जप्तीसह गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच साऊंड लावले तरी ज्या त्या परिसरात ठरवून दिलेल्या डेसीबलपेक्षा जास्त आवाज आल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ३४ यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत.विसर्जनस्थळी विशेष बंदोबस्तगणेश मूर्ती विसर्जनासाठी ठिकाण ठरवून देण्यात आलेले आहेत. याठिकाणी नगर पालिका, अग्निशमन विभाग, बीडीडीएस पथक, दंगल नियंत्रण पथक, स्वच्छता विभागांसह विशेष पथके तैनात असणार आहेत. तसेच विजेसह इतर सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याठिकाणी पोलिसांनी फिक्स पॉर्इंट लावले आहेत.\\\डीजेला पूर्णपणे बंदी असेल. साऊंडला परिसरात (दवाखाने, निवासी परिसर, शाळा) ठरवून दिलेल्या नियमानुसार डेसीबलपर्यंत आवाज करता येईल. आवाज मोजण्यासाठी यंत्र उपलब्ध केली आहेत. तसेच कॅमेरे, विशेष पथके, पोलीस अधिकारी, कर्मचारी मिरवणुकीवर नजर ठेवतील. मद्यपींवरही कारवाई केली जाणार आहे. मिरवणुकीत शांतता रहावी, यासंदर्भात गणेश मंडळांची बैठक घेऊन त्यांना सुचना केल्या आहेत. शिवाय त्यांना नोटीसाही दिल्या आहेत. - जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड
बीडमध्ये मंडळांवरच सुरक्षेची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:27 AM
लाडक्या बाप्पांना रविवारी निरोप देण्यात येणार आहे. या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागू न देता जल्लोष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यावर्षी पोलिसांकडून तर तगडा बंदोबस्त आहेच, शिवाय गणेश मंडळांवरही काही प्रमाणात सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्या मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांभाळावे लागणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास थेट मंडळ व कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ठळक मुद्देजल्लोष करा, पण गालबोट लागू देऊ नका - पोलिसांकडून आवाहन