: तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या ३६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होत असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक विभागाचे प्रमुख नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी दिली. धारुर तालुक्यात चार ग्रामपंचायतींच्या ३६ जागांसाठी मतदान झाले. ९८ उमेदवार रिंगणात होते. सोमवारी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असून, चार टेबलवर २६ कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. मोजणी सुरू झाल्यानंतर एक तासामध्ये सर्व निकाल घोषित होतील, असे अपेक्षित आहे. जमावबंदी आदेश असल्याने मतमोजणीच्या दिवशी विजय शांततेने साजरा करावा. नियमांचे पालन करावे. विजयी मिरवणूक कुणीही काढू नये. फटाके व वाद्य वाजवू नये. कायद्याचे पालन करावे. उल्लघंन करणारांविरुद्ध कडक कार्यवाही केली जाईल, असे पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी सांगितले.
धारुर तालूक्यातील ग्रामपंचायतींचा एका तासात लागणार निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:30 AM