गेवराई : तालुक्याच्या हद्दीतील वाळू ठेका असताना घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथील वाळू उपसली जात असल्याची माहिती तहसीलदार संगीता चव्हाण यांना झाल्यानंतर त्यांनी पहाटे सहा वाजताच भोगगाव येथे धाड टाकून बारा हायवा टिप्पर पकडले.या घटनेची माहिती घनसावंगीचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना दिल्यानंतर त्यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, नायब तहसीलदार संदीप मोरे,मंडळ अधिकारी एस. टी. साळवे, डी.के. अंबडकर, के. बी. खोतकर यांच्या पथकाने वाळू घाटावर दहा वाहने कारवाईसाठी ताब्यात घेतली.गेवराईच्या तहसीलदार संगीता चव्हाण, मंडळ अधिकारी तांबारे, तलाठी देशमुख, वाकोडे, पोलीस कर्मचारी तळेकर यांनी ताब्यात घेतली. सदरील कारवाईने तालुक्यामधील वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली.तहसीलदारांनी पकडलेले वाळूचे वाहन पळवून नेण्याचा प्रयत्नमाजलगाव तालुक्यातील हिवरा (बु) वाळूघाट परिसरात सावरगाव शिवारात तहसीलदारांनी पकडलेला हायवा टिप्पर तहसील कार्यालयाकडे घेऊन जाताना तो अडवून पळवून नेण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री करण्यात आला. याप्रकरणी सात जणांवर चोरी आणि शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हिवरा (बु)येथे १०-१२ दिवसांपासून वाळूचा ठेका सुरु आहे. येथे सर्व नियमांची पायमल्ली करु न वाळू उपसा सुरु आहे.हायवा टिप्परमध्ये तीन ब्रास वाळूला परवानगी असताना पाच ते सहा ब्रास वाळू घेऊन जात असल्याची माहिती तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे यांना मिळाली होती. मंगळवारी सायंकाळी बीड येथून माजलगावकडे जाताना सावरगाव शिवारात वाळू घेऊन जाणारे हायवा टिप्पर अडवून पाहणी केली असता त्यांना पाच ब्रास वाळू आढळून आली. तसेच वाहनाचे लोकेशन तपासले असता शासनाकडे नोंदणी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे गोरे यांनी त्यांच्या वाहनाचे चालक संजय भागवत यास सदर टिप्पर तहसील कार्यालयाकडे नेण्याचे सांगितले. भागवत हे सदर वाहन घेऊन जाताना जीवन जगताप, नागेश पडघम व इतर चार- पाच जणांनी अडविला.चालक भागवत यास खाली ओढून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांच्या फिर्यादीवरु न मंगळवारी रात्री ११.३० वाजता सात जणांविरु द्ध चोरी व शासकीय कामात अडथळा, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच महाराष्ट्र जमीन महसूल व महाराष्ट्र गौणखनिज अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके करत आहेत.२४ तासांनंतरही आरोपी मोकाटचमाजलगावच्या तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी धाडसाने हायवा टिप्पर ताब्यात घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी यातील आरोपी मात्र २४ तास उलटूनही मोकाटच आहेत.या बाबत तहसीलदारांनी पोलिसांना फोन लावून विचारले असता, पोलिसांकडून ‘नन्ना’ चा पाढा वाचल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.गोदावरी नदीच्या पात्रातील गंगावाडी शिवारातील वाळूचा लिलाव झालेला आहे. पण घनसावंगी हद्दीतील भोगगाव येथून वाळू उपसली जात असल्याची माहिती गेवराईच्या तहसीलदार संगीता चव्हाण यांना झाल्यानंतर त्यांनी सकाळी सहा वाजता फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले.कारवाईच्या वेळी कोणती हद्द आहे? कोठे वाळू भरायची हे लिलावधारकाने सांगायला हवे, यात आमचा काय दोष,कारवाई करायची तर लिलावधारकांवर करा असे म्हणत टिप्पर चालकांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली.
गेवराई, घनसावंगीत १२ वाळू टिप्परवर महसूलची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:37 PM
तालुक्याच्या हद्दीतील वाळू ठेका असताना घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथील वाळू उपसली जात असल्याची माहिती तहसीलदार संगीता चव्हाण यांना झाल्यानंतर त्यांनी पहाटे सहा वाजताच भोगगाव येथे धाड टाकून बारा हायवा टिप्पर पकडले.
ठळक मुद्देहद्द सोडून वाळू उपसा : गंगावाडी वाळूघाटावर महसूल पथकाची विशेष मोहीम