गेवराई (बीड ) : तालुक्यातील विविध ठिकाणाहून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल प्रशासनाने कारवाई केली. यात वाहतूक करणारी वाहने आणि वाळू असा ५४ लाखाचा मुदेमाल जप्त करण्यात आला.
तालुक्यात विविध ठिकाणी वाळूची तस्करी सुरु असल्याची माहिती नायब तहसीलदार अभय जोशी, प्रशांत जाधवर यांना मिळाली. त्यानुसार दि. १९ व दि. २२ जानेवारीस महसूलच्या पथकाने बागपिपंळगाव, पाडळसिंगी टोल नाका, बायपास रोडवर सापळा रचून वाळू वाहतूक करणारी तीन टिपर वाहने ताब्यात घेतली. यावेळी तलाठी जितेंद्र लेंडळ, कमलेश सुरावर, काशीद, केरुलकर, ससाने, निशांत ठाकुर, सुनिल ताबारे यांचा पथकात समावेश होता.