बीड : महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात या मागणीसाठी बुधवारी जिल्हाभरात कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन केले होते. यावेळी प्रत्येक कार्यालयासमोर धरणे देखील देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे कामकाज ठप्प झाले होते.बीड जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयातील महसूल कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले. यावेळी शासन निर्णय निर्गमीत न झाल्यामुळे नायब तहसीलदार यांना राजपत्रित अधिकाºयांचा दर्जा देण्यात यावा, महसूल लिपीकांचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करणे बाबत, नायब तहसीलदार सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ टक्क्यावरुन २० टक्के करणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्यात यावी, विभाग अंतर्गत जिल्हा बदलीचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात यावेत, जिल्ह्यात गौण खनिज उत्खननामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून, त्यासाठी प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक हे अव्वल कारकुन दर्जाचे पद निर्माण करावे, यासह ५३ वर्ष झाल्यानंतर कर्मचाºयांना इच्छीत स्थळी बदली देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील जवळपास ८०० कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी राज्य उपाध्यक्ष सुहास हजारे, राज्यकोषाध्यक्ष राहुल शेटे, चंद्रकांत जोगदंड, महादेव चौरे, जयंत तळीकेडे, श्रीनिवास मुळे, हेमलता परचाके यांच्यासह कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.
महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन; कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:17 AM
महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात या मागणीसाठी बुधवारी जिल्हाभरात कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन केले होते. यावेळी प्रत्येक कार्यालयासमोर धरणे देखील देण्यात आले.
ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील ८०० कर्मचारी सहभागी