लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी : भूकंप पुनर्वसन मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शनिवारी तालुक्यातील कान्हापूर शिवारात रस्त्यावरुन थेट शेतात जाऊन पाहणी करुन दुष्काळी स्थितीचा माहिती शेतक-यांशी चर्चा करत जाणून घेतली.शेतकरी शंकर चव्हाण यांच्या गटनंबर ३४२ मध्ये थेट शेतात जाताच निलंगेकर यांच्यासमोर शेतकºयांनी दुष्काळी परिस्थितीचा पाढा वाचायला सुरूवात केली. शेतकºयांनी घाबरून जाऊ नये, सरकार उपाय योजना करील असे आश्वासन देत निलंगेकर यांनी धीर दिला. यावेळी शंकर चव्हाण यांनी दुष्काळी परिस्थिती मुळे कापूस, सोयाबीन, मुगाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटल्याची व्यथा मांडली. दुष्काळ जाहीर करुन शेतकºयांना मदत करण्याची मागणीही केली.यावेळी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार, तहसीलदार सुनील पवार,भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे रमेश आडसकर, बाबरी मुंडे, संजय आंधळे, गोविंद मस्के, मंडळ अधिकारी सुनिता राठोड तलाठी भूषण पाटीलसह पदाधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.शेतकºयांची व्यथा : मदतीचे आश्वासनउत्पादन खर्चही डोक्यावर डोईजड बनला आहे. पीक कर्ज कसे फेडावे असा प्रश्न केला. पाणी टंचाईचा सामना करत जनावरांच्या चारा, पाण्याच्या शोधात भयकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र मांडले.महावितरणाच्या गलथान कारभारामुळे शेतककºयांना वेठिस धरले जात असून वीज पुरवठा बंद असतानाही बिले आकारत वीज कनेक्शन तोडले जात आहेत. पाणीच नाही तर बिल कसे भरणार असा सवाल करत हा प्रश्न सोडविण्याची विनंती यावेळी इतर शेतकºयांनी केली. यावर सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी यावेळी दिले.
वडवणीत दुष्काळाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:25 AM
भूकंप पुनर्वसन मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शनिवारी तालुक्यातील कान्हापूर शिवारात रस्त्यावरुन थेट शेतात जाऊन पाहणी करुन दुष्काळी स्थितीचा माहिती शेतक-यांशी चर्चा करत जाणून घेतली.
ठळक मुद्देपुनर्वसनमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी कान्हापूर शिवारात शेतकऱ्यांशी केली चर्चा