मंगळवारी सकाळी त्यांची दुचाकी मिळाली. मात्र, त्यांचा शोध लागला नव्हता. त्यांचे शोधकार्य मंगळवारी दुपारपर्यंत सुरू होते.
विष्णू तुकाराम नन्नवरे (वय ४५), असे वाहून गेलेल्याचे नाव आहे. ते सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास आपली दुचाकी (क्रमांक एमएच-२३ एएम-४१६४) ने बागपिंपळगाव फाट्याहून तलवाडा रोडकडे जात होते. कोल्हेर शिवारातील उजव्या कालव्यावरील पुलाला कठडे नसल्याने त्यांची दुचाकी उजव्या कालव्यात पडली. सध्या उजव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ते या पाण्यात वाहून गेले. त्याचा शोध मंगळवार रोजी सुरू असताना याच कालव्यात त्यांची दुचाकी मिळाली असून, ते मात्र अद्याप सापडले नाहीत. यावेळी उजव्या कालव्यात विविध ठिकाणी जाळे लावण्यात आले आहे. यावेळी नागरिक, पोलीस उपस्थित होते.
मंगळवारी सकाळी त्यांची दुचाकी मिळाली. याच पुलावरून दुचाकीसह नन्नवरे हे कालव्यात पडले होते.
===Photopath===
270421\sakharam shinde_img-20210427-wa0034_14.jpg~270421\sakharam shinde_img-20210427-wa0018_14.jpg