तालुक्यातून गेलेला पैठण उजवा कालवा असून या कालव्याची गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. कालव्यात जागोजागी बाभळी उगवल्याने व अनेक ठिकाणी आता नुसती माती शिल्लक राहिली आहे. तरीदेखील पाटबंधारे विभागाच्या वतीने यातून शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येते. यात बागपिंपळगाव शिवारातील पैठण उजवा कालवा काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने पाच ते सहा दिवसांपूर्वी फुटला आहे. त्यातून पाणी वाहिल्याने जवळील शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा कालवा फुटून पाच-सहा दिवस झाले तरी पाटबंधारे विभागाचा कोणताच अधिकारी इकडे फिरकला नाही. कालवा फुटून नुकसान झालेल्या शेताची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
---
६ सप्टेंबर रोजी बागपिंपळगाव जवळील उजव्या कालवा फुटला आहे. त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याचे पाटबंधारे विभाग बागपिंपळगाव येथील शाखा अधिकारी एन. एन. जगताप यांनी सांगितले.
120921\sakharam shinde_img-20210912-wa0027_14.jpg