लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : शहरातील उद्योग अनलॉकनंतर तब्बल दीड ते दोन महिन्यांनंतर सुरू झाले आहेत. उद्योग सुरू झाल्यामुळे सर्वच दुकानांमध्ये अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी गर्दी होत आहे. परंतु, केज रोडवर नगरपरिषदेने खोदून ठेवलेल्या पाच फूट नाल्यांमुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. घाणीचा व्यापारी व ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
धारूर शहरातील केज रोडवर नगरपरिषदेने गेल्या तीन महिन्यांपासून नाली खोदून ठेवली आहे. ही नाली तीन ते चार फूट खोल आहे. एका बाजूला सर्व व्यापाऱ्यांची दुकाने त्याठिकाणी आहेत. उदय नगरमधील नागरिकांच्या तक्रारीवरून पाणी तुंबत असल्याने नगरपरिषदेने ही नाली खोदून ठेवली. परंतु, नालीचे काम पूर्ण केलेले नाही. नाली तीन ते चार फूट खोल आहे. यामुळे येथे अपघाताचा धोका वाढला आहे. आतापर्यंत अनेकजण या नालीत पडून जखमी झाले आहेत. तरी धारूर नगरपरिषदेने लवकरात लवकर या नालीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी विश्व मानव अधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अतिक मोमीन यांनी केली आहे.