लोकमत न्यूज नेटवर्कगंगामसला : माजलगाव तालुक्यात गतवर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने माजलगाव धरण शंभर टक्के भरले होते. धरण भरल्याने व कालव्याला पाणी सोडल्याने तालुक्यात आडसाली ३२२ हेक्टर, पूर्वहंगामी ४ हजार ६०५ हेक्टर नवीन उसाची लागवड ७ हजार ६८२ हेक्टर तसेच खोडवा ऊस ४ हजार ९२२ हेक्टर अशा एकूण १७ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली. यंदा माजलगाव धरणाच्या कालव्यावर अवलंबून असलेले उसाचे पीक पाण्याअभावी व हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने धोक्यात आले आहे. त्यामुळे उसाचे वजन निम्म्याने घटणार आहे.तालुक्यामध्ये गेल्या वर्षी बोंडअळीने थैमान घालून शेतकºयांना उभ्या पिकावर नांगर चालविण्याची वेळ आणली.त्यामुळे शेतकºयांनी आपल्या शेतातील कापूस उपटून टाकला व धरणाचे पाणी कालव्यांमध्ये सुटणार असल्याने आनंदात उसाची लागवड केली होती. त्यातच २६५ जातीच्या उसाला कारखानदारांनी लाल झेंडा दाखवल्याने शेतकºयांना सावकारी कर्ज काढून पाच ते सहा हजार रु पये टनाप्रमाणे महागामोलाचे दुसºया जातीचे उसाचे बेणे विकत घ्यावे लागले आणि माजलगाव धरणाच्या कालव्याच्या आधारावर शेतामध्ये उसाची लागवड केली.परंतु यावर्षी पावसाने उघडीप दिल्याने हजारो रुपये खर्च करून रात्रंदिवस मेहनत, मशागत करून उभे केलेले उसाचे पीक पाण्याअभावी व हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने धोक्यात आले आहे. उसाचे वजन निम्म्याने घटणार असल्याने यावर्षी शेतकºयांना ऊस उत्पादनात आर्थिक नुकसान सहन करावा लागणार आहे.
कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेले उसाचे नगदी पीक आले धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:08 AM
यंदा माजलगाव धरणाच्या कालव्यावर अवलंबून असलेले उसाचे पीक पाण्याअभावी व हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने धोक्यात आले आहे. त्यामुळे उसाचे वजन निम्म्याने घटणार आहे.
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : उसाचे वजन निम्म्याने घटणार; २६५ जातीच्या उसाला कारखानदारांनी लाल झेंडा दाखविल्याने शेतकऱ्यांना कर्ज काढून घ्यावे लागले बेणे